Fabian Alien SA20 West Indies 
क्रीडा

SA20: वेस्ट इंडिजचा खेळाडू थोडक्यात वाचला, डोक्याला बंदूक लावत चोरट्यांनी लुटले

Ashutosh Masgaunde

West Indies cricketer Fabian Allen was recently robbed at gunpoint in Johannesburg during the SA20 league:

दक्षित आफ्रिकेत सुरू असलेल्या SA20 लीग दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वेस्ट इंडिजचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू फॅबियन ॲलन याला नुकतेच जोहान्सबर्ग येथे डोक्याला बंदूक लावत लुटण्यात आले. 28 वर्षीय जमैकाच्या अष्टपैलू खेळाडूला टीम हॉटेलबाहेर लक्ष्य करण्यात आले. एसए टी20 लीगमध्ये फॅबियन ऍलन पार्ल रॉयल्सकडून खेळतो.

पार्ल रॉयल्स संघ, SA20 आणि क्रिकेट वेस्ट इंडीज (CWI) शी संबंधित अनेक स्त्रोतांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

वेस्ट इंडिज संघाशी संबंधीत एका स्त्रोताने या घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की, ॲलनला या घटनेदरम्यान कोणतीही इजा झालेली नाही.

बंदुकधारी हल्लेखोरांनी प्रसिद्ध सँडटन सन हॉटेलजवळ ॲलनला घेरले आणि त्याचा फोन आणि बॅगसह वैयक्तिक सामान जबरदस्तीने काढून घेतले. या घटनेमुळे SA20 मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे.

फॅबियन ऍलनने वेस्ट इंडिजकडून आतापर्यंत 20 एकदिवसीय आणि 34 टी-20 सामने खेळले आहेत. या 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 200 धावा केल्या आहेत आणि 7 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर टी-20 मध्ये त्याने 267 धावांसह 24 विकेट घेतल्या आहेत. फॅबियन ऍलन आयपीएलमध्येही खेळला आहे.

उल्लेखनीय आहे की ही घटना अलीकडच्या काळातील SA20 खेळाडूंच्या सुरक्षेशी संबंधित दुसरी घटना आहे.

लीगचा हा दुसरा हंगाम आहे जो प्लेऑफच्या टप्प्यात पोहोचला आहे. पार्ल रॉयल्स 7 फेब्रुवारीला रात्री क्वालिफायर 1 नंतर एलिमिनेटर खेळेल. तर 10 फेब्रुवारीला स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT