मानवी तस्करीच्या बळींना दरमहा 10 हजार द्या! 'अर्ज' संस्थेची मुख्यमंत्र्यांकडे धाव; 45 वर्षांवरील महिलांसाठी 5 हजार पेन्शनचीही मागणी

ARZ Goa Human Trafficking Demand: ‘अर्ज’ संस्थेनं मानवी तस्करीतील बळी युवतींसाठी ‘प्रभात’ योजनेत स्टायपेंड १० हजारांपर्यंत वाढवावे व ४५ वर्षांवरील महिलांना मासिक ५ हजार रुपये पेन्शन द्यावी, अशी मागणी केली.
ARZ Goa Human Trafficking Demand
ARZ Goa Human Trafficking DemandDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मानवी तस्‍करीच्‍या घटनांत बळी पडणाऱ्या युवतींना ‘प्रभात’ या योजनेअंतर्गत स्‍टायपेंडमध्‍ये १० हजार रुपयांपर्यंत वाढ करण्‍यात यावी तसेच ४५ वर्षांवरील अशा महिलांना पेन्‍शन म्‍हणून मासिक पाच हजार रुपये देण्‍यात यावे, अशी मागणी ‘अर्ज’ या संस्‍थेचे संस्‍थापक अरुण पांड्ये यांनी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.

राज्‍याचा अर्थसंकल्‍प येत्‍या ६ मार्च रोजी सादर होणार आहे. या अनुषंगाने मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी विविध सामाजिक संस्‍थांकडूनही सूचना मागवल्‍या होत्‍या. त्‍यानुसार पांड्ये यांनी लैंगिक शोषणाच्‍या बळी पडलेल्‍या युवती, महिलांच्‍या कल्‍याणासाठीच्‍या मागण्‍या सरकारला सादर केलेल्‍या असून, आपल्‍या सूचनांची अंमलबजावणीची मागणीही त्‍यांनी केलेली आहे.

ARZ Goa Human Trafficking Demand
Goa Tourism: गोव्यातील किनारी पर्यटनाचा आंध्र सरकारकडून अभ्यास, तीन दिवस पाहणी; शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

राज्‍यात सेक्स वर्कर्सच्या कल्याणासाठी प्रभात योजना राबवण्‍यात येत असून, त्‍याअंतर्गत सुरू असलेल्‍या उपजीविका कार्यक्रमाद्वारे लैंगिक शोषणाच्‍या बळी पडलेल्‍या युवती, महिलांना मासिक २,५०० रुपये स्टायपेंड म्‍हणून देण्‍यात येतात. ही रक्कम खूपच कमी असून, ती १० हजार रुपयांपर्यंत वाढवावी, असे पांड्ये यांनी सरकारला सादर केलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे.

‘अर्ज’च्‍या मागण्‍या अशा...

व्यावसायिक लैंगिक क्रियाकलापांमध्ये गुंतलेल्या महिलांच्या किशोरवयीन मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना, वसतीगृह सुविधा, मार्गदर्शन आणि त्‍यांना रोजगार देण्‍यात यावा.

खटल्यादरम्यान साक्ष देण्यासाठी येणाऱ्या पीडितेला प्रवास खर्च, निवास व्यवस्था, निर्वाह भत्ता, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्‍यवस्‍था करण्‍यात यावी.

मानवी तस्करीच्‍या बळींसाठी व्यवसाय युनिट्स स्थापन करण्‍यात यावे. तेथे त्यांना किमान मासिक १५ हजार रुपये पगारासह ईएसआय, ईपीएफची सुविधा द्यावी.

ARZ Goa Human Trafficking Demand
Goa History: 1320 च्या दशकात खिलजी सेनापती मलिक काफूरने गोपकपट्टण लुटले; आर्यादुर्गा व गोव्यातील कदंब

१४ हजार युवती, महिला व्‍यवसायात

राज्‍यात सध्‍या सुमारे १४ हजार युवती, महिला लैंगिक व्‍यवसायात गुंतलेल्‍या असून, त्‍यातील सुमारे ६,८०० महिलांची गोवा राज्य एड्स नियंत्रण सोसायटीत नोंद आहे. तर, उर्वरित सुमारे ७ हजार महिलांची भारतातील विविध राज्ये आणि इतर देशांमधून गोव्यात तस्करी करण्‍यात आलेली आहे.

युवती, महिलांची तस्करी रोखण्यासाठी तसेच त्यांचे संरक्षण, पुनर्वसनासाठी अर्ज संस्‍था गेल्‍या अनेक वर्षांपासून काम करीत आहे. त्‍यांच्‍यासाठी आपल्‍या संस्‍थेने सध्‍या राज्‍यात दोन उपजीविका केंद्रे सुरू केलेली असून, ५५ महिलांना रोजगारही उपलब्‍ध करून दिलेला आहे, असेही पांड्ये यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com