'जीईसी'च्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प, 100 किलोवॅट क्षमता; प्रकल्पावर अंदाजित 31.15 कोटी खर्च

GEC Farmagudi Solar Project Tender: वीज खात्याने फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या छतावर नवीकरणीय ऊर्जा प्रणाली उभारण्यासाठी मोठी सौर ऊर्जा निविदा जाहीर केली आहे.
GEC Farmagudi Solar Project Tender
GEC Farmagudi Solar Project TenderDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वीज खात्याने फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या छतावर नवीकरणीय ऊर्जा प्रणाली उभारण्यासाठी मोठी सौर ऊर्जा निविदा जाहीर केली आहे. या प्रकल्पांतर्गत ५ मेगावॅट क्षमतेचा जमिनीवर उभारण्यात येणारा सौर ऊर्जा प्रकल्प तसेच १०० किलोवॅट क्षमतेची छतावरील सौर प्रणाली उभारण्यात येणार आहे.

यामध्ये डिझाईन, खरेदी, पुरवठा, उभारणी, चाचणी व कार्यान्वयन यांसह वीज वहन (इव्हॅक्युएशन) पायाभूत सुविधा विकसित करणे आणि १० वर्षांचा सर्वसमावेशक संचालन व देखभाल करार यांचा समावेश आहे. प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च सुमारे ३१.१५ कोटी रुपये इतका आहे.

GEC Farmagudi Solar Project Tender
Goa Tourism: गोव्यातील किनारी पर्यटनाचा आंध्र सरकारकडून अभ्यास, तीन दिवस पाहणी; शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

राज्यात स्वच्छ ऊर्जेची क्षमता वाढविणे आणि पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी करणे या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. महाविद्यालयाच्या परिसरातील उपलब्ध मोकळी जागा व इमारतींची छते यांचा कार्यक्षम वापर करून जमिनीवरील आणि छतावरील सौर प्रकल्पांचा समन्वित विकास करण्यात येणार आहे.

निविदा प्रक्रिया दोन पाकिट पद्धतीने (टेक्नो-कमर्शियल बोली व आर्थिक बोली) राबविण्यात येणार आहे. इच्छुक बोलीदारांना १,५०० रुपयांचे न परतवण्यायोग्य निविदा अर्ज शुल्क तसेच ६,००० रुपयांचे प्रक्रिया शुल्क भरावे लागेल. पात्रतेसाठी गोवा सरकारकडून जारी केलेला ३३ केव्ही व त्यावरील वैध विद्युत कंत्राटदार परवाना आवश्यक आहे.

तसेच कंपन्या व ऊर्जा विकास यंत्रणेकडे नोंदणीकृत सौर विक्रेते असणे बंधनकारक आहे. यशस्वी बोलीदाराला पावसाळ्यासह संपूर्ण प्रकल्प १२ महिन्यांत पूर्ण करावा लागेल. प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर २४ महिन्यांची हमी कालावधी लागू राहील. त्यानंतर १० वर्षांच्या करारान्वये देखभालीची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराकडे राहील.

GEC Farmagudi Solar Project Tender
Goa Accident: शिवोली पुलावर भीषण अपघात; कार आणि कदंब बसची समोरासमोर धडक, वाहतुकीचा मोठा खोळंबा

पाहणी दौरा करावा

बोली सादर करण्याची अंतिम तारीख १० मार्च आहे. टेक्नो-कमर्शियल बोली १२ मार्च रोजी उघडण्यात येतील, तर आर्थिक बोली उघडण्याच्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील. सर्व बोली १८० दिवसांसाठी वैध असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com