IPL 2023 Playoff Timetable: टॉप चार संघ निश्चित! केव्हा होणार प्लेऑफच्या मॅच, पाहा संपूर्ण वेळापत्रक

IPL 2023 मधील अंतिम चार संघ निश्चित झाले आहे, आता प्लेऑफमधील सामन्यांचे वेळापत्रक कसे आहे, जाणून घ्या.
IPL 2023 Playoff Timetable
IPL 2023 Playoff TimetableDainik Gomantak

IPL 2023 Playoff Schedule: रविवारी (21 मे) इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धतील साखळी फेरीतील सर्व 70 सामने संपले. रविवारी मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादला 8 विकेट्सने आणि गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला 6 विकेट्सने पराभूत केले. या सामन्यांनंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफचे तिकीट मिळवणारा चौथा संघ ठरला.

त्यामुळे आता आयपीएल 2023 मधील अंतिम 4 संघ निश्चित झाले आहेत. आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या चार संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आता 23 मे पासून प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे.

IPL 2023 Playoff Timetable
IPL 2023: शुभमन गिलचं शतक अन् RCB चा स्वप्नभंग! गुजरातच्या विजयानं मुंबई Playoff मध्ये

प्लेऑफमध्ये जागा मिळवणाऱ्या संघाचे रिपोर्ट कार्ड

गुजरात टायटन्सने 14 सामन्यांमध्ये 10 सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर 4 सामन्यांमध्ये पराभव स्विकारला. त्यामुळे गुजरात 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर राहिले. त्यानंतर गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर 17 गुणांसह चेन्नई सुपर किंग्स संघ राहिला आहे.

चेन्नई सुपर किंग्स संघाने 14 सामन्यांमध्ये 8 सामने जिंकले, तर 5 सामने पराभूत झाले. तसेच 1 सामना पावसामुळे रद्द झाला.

तसेच लखनऊ सुपर जायंट्सचेही 17 गुण झाले, मात्र नेट रन रेटच्या फरकामुळे लखनऊला तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागले. लखनऊनेही 14 सामन्यांमध्ये 8 सामने जिंकले, 5 सामने पराभूत झाले आणि 1 सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर चौथा क्रमांक 16 गुणांसह मुंबई इंडियन्सने मिळवला. मुंबईने 14 सामन्यामध्ये 8 सामने जिंकले, तर 6 सामने पराभूत झाले.

असे होणार प्लेऑफचे सामने

आता आयपीएल 2023 गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर राहिलेले गुजरात आणि चेन्नई या दोन संघांत 23 मे रोजी प्लेऑफमधील पहिल्या क्वालिफायरचा सामना रंगेल. तसेच 24 मे रोजी गुणतालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघ लखनऊ आणि मुंबई यांच्यात एलिमिनेटरचा सामना होईल.

त्यानंतर 26 मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना होईल. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत होणारा संघ आणि एलिमिनेटरमध्ये विजय मिळवणारा संघ एकमेकांविरुद्ध खेळतील.

IPL 2023 Playoff Timetable
IPL 2023: ग्रीनचं शतक अन् मुंबईने ठोकली Playoff ची दावेदारी! हैदराबादचा शेवटच्या मॅचमध्ये दारुण पराभव

तसेच पहिल्या क्वालिफायरमध्ये जो संघ विजय मिळवेल, तो संघ थेट अंतिम सामना खेळेल. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्यात प्रवेश करणारा दुसरा संघ ठरेल. 28 मे रोजी अंतिम सामना होणार आहे.

पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटरचा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. तसेच दुसरा क्वालिफायर आणि अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हे प्लेऑफमधील सर्व चार सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता चालू होतील.

असे आहे आयपीएल 2023 प्लेऑफचे वेळापत्रक

  • 23 मे - पहिला क्वालिफायर - गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, चेन्नई (वेळ - संध्याकाळी 7.30 वा.)

  • 24 मे - एलिमिनेटर - लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, चेन्नई (वेळ - संध्याकाळी 7.30 वा.)

  • 26 मे - दुसरा क्वालिफायर - पहिल्या क्वालिफायरचा पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटरचा विजयी संघ, अहमदाबाद (वेळ - संध्याकाळी 7.30 वा.)

  • 28 मे - अंतिम सामना - पहिल्या क्वालिफायरचा विजेता विरुद्ध दुसऱ्या क्वालिफायरचा विजेता, अहमदाबाद (वेळ - संध्याकाळी 7.30 वा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com