Goa Politics: गोव्‍यातील निवडणुकीत 'आप'ने 45 कोटी खर्च केल्‍याचा दावा खोटा- वाल्‍मिकी नाईक

Valmiki Naik Statement on AAP Court Verdict: गोव्‍यातील गत विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) ४५ कोटी रुपये खर्च केल्‍याचा आरोप झाला.
Goa Politics
Goa PoliticsDainik GOMANTAK
Published on
Updated on

पणजी: गोव्‍यातील गत विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) ४५ कोटी रुपये खर्च केल्‍याचा आरोप झाला. परंतु, तो आरोप पूर्णपणे खोटा होता, हे न्‍यायालयाने दिल्लीचे माजी मुख्‍यमंत्री तथा ‘आप’चे राष्‍ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्‍यमंत्री मनीष सिसोदिया यांच्‍याबाबत दिलेल्‍या निवाड्यातून स्‍पष्‍ट झालेले आहे. हा निवाडा म्हणजे सत्याचा विजय असल्‍याचे ‘आप’चे राज्‍य निमंत्रक वाल्‍मिकी नाईक यांनी सांगितले.

नवी दिल्लीतील जाहीर सभेत ते बोलत होते. दिल्लीतील मद्य घोटाळ्यातून केजरीवाल आणि सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता झाल्‍यानंतर नाईक यांच्‍यासह ‘आप’च्‍या राज्‍यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत जाऊन या दोन्‍ही नेत्‍यांची भेट घेतली. वाल्‍मिकी नाईक यांच्‍यासह कार्याध्यक्ष गर्सन गोम्स, वरिष्ठ उपाध्यक्ष संदेश तळेकर, उपाध्यक्ष रॉक मस्कारेन्हास यांचाही समावेश होता.

Goa Politics
Goa Tourism: गोव्यातील किनारी पर्यटनाचा आंध्र सरकारकडून अभ्यास, तीन दिवस पाहणी; शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

‘आप’चा वाढता प्रभाव!

‘आप’चा वाढता प्रभाव आणि स्वच्छ कारभारामुळेच पक्षाला लक्ष्य करण्यात आले. दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक, सरकारी शाळांमधील सुधारणा आणि पंजाबमधील कामांमुळे भाजप अस्वस्थ झाला असल्‍याचे गर्सन गोम्स म्‍हणाले. तर, हा निकाल सूडाच्या राजकारणाला दिलेले ठोस उत्तर आहे. पक्ष फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण ‘आप’चे नेते एकजूट राहिले. यापुढे भाजपच्या दुहेरी धोरणांचा पर्दाफाश केला जाईल, असा इशारा मस्कारेन्हास यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com