Goa Ganesh Idol Vendor Registration Dainik Gomantak
गोवा

Ganesh Idol: 'पोर्टल'वर नोंदणी करणाऱ्यांनाच विकता येणार राज्यात गणेशमूर्ती, प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले निर्देश

Goa Ganesh Idol Vendor Registration: प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसच्‍या (पीओपी) गणेशमूर्तींवर लगाम घालण्‍यासाठी राज्‍य पर्यावरण खात्‍याने कडक पावले उचलली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसच्‍या (पीओपी) गणेशमूर्तींवर लगाम घालण्‍यासाठी राज्‍य पर्यावरण खात्‍याने कडक पावले उचलली आहे. राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळाला यासंदर्भात पोर्टल सुरू करण्‍याचे तसेच येत्‍या १५ जुलैपर्यंत पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या मूर्तिकारांनाच राज्यात गणेश मूर्ती विकण्याची किंवा आयात करण्याची परवानगी देण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहेत.

पर्यावरण संचालकांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. राज्‍यातील काही गणेशमूर्तीकार पीओपी गणेशमूर्ती बनवत आहेत. तर, काही जण छुप्‍या पद्धतीने महाराष्‍ट्रातून अशा मूर्तींची आयात करीत आहेत. त्‍याचा फटका स्‍थानिक मूर्तीकारांना बसत आहे.

त्‍यामुळे सरकारने याबाबत कडक पावले उचलावी, अशी मागणी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी नुकत्‍याच झालेल्‍या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनात मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍याकडे केली होती. त्‍यानुसार पर्यावरण खात्‍याने अशा गणेशमूर्ती रोखण्‍यासाठी उपाययोजना राबवण्‍यास सुरुवात केलेली आहे.

त्‍याचाच भाग म्‍हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाला पोर्टल सुरू करून गणेश मूर्तिकारांची नोंदणी करण्‍यास सांगण्‍यात आले आहे. गणेशमूर्ती विक्रेत्‍यांना या पोर्टलवर मूर्तीची विक्री करणाऱ्या अधिकृत व्यक्तीचे नाव, संपूर्ण पत्त्यासह विक्रीचे ठिकाण, ई–मेल आयडी, मोबाईल क्रमांक आदी सर्व बाबी नोंद कराव्या लागणार आहेत.

विल्हेवाटीच्या पद्धतीची माहिती

गणेशमूर्ती विक्रेत्यांना सदर मूर्ती चिकन माती, शाडू मातीपासून बनवलेल्या असून त्यामध्ये २० टक्क्‍यांपेक्षा जास्त पीओपी घटक नाही असे रितसर स्वाक्षरी केलेले हमीपत्र तसेच गणेशोत्सवानंतर न विकलेल्या मूर्तींची संख्या आणि त्यांच्या साठवणुकीची किंवा विल्हेवाटीची प्रस्तावित पद्धत याबाबतची माहिती पोर्टलवर अपलोड करावी लागणार असल्‍याचे आदेशात म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Landslide: दरड कोसळून 1 कामगार ठार; 1 जखमी, सडा-हार्बर मार्गावर रस्त्याच्या कामावेळी दुर्घटना; प्रसंगावधनामुळे तिघे वाचले

Goa Waste Management: कचरा फेकणाऱ्यांची नावे फोटोसह करणार प्रसिद्ध; 'हॉल ऑफ शेम' फेसबूक पेजची निर्मिती, हळदोण्यातील अस्वच्छतेविरोधात संताप

VIDEO: धावणे, पोहणे अन् शुद्ध हवा! अर्जुन रामपालने मुंबई सोडून गोव्यात का थाटला संसार? अभिनेत्यानं सांगितलं लाईफस्टाईलचं गुपित

Ishan Kishan troll CSK fans: चेपॉकवर 'Whistle Podu' स्टाईलने ईशानने चेन्नईला डिवचले, चाहत्यांना दिला 'घरी जाण्याचा' इशारा Video Viral

British Tourist Dead: कळंगूटमधील हॉटेलमध्ये ब्रिटीश नागरिकाचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT