Goa Accident: दोनापावल-बांबोळी मार्गावर आलिशान भरधाव कारचा कहर; ठोकर दिल्याने तरुणी ठार, युवक गंभीर

Diksha Parwadkar Accident Death: दोनापावल-बांबोळी मार्गावर रविवारी मध्यरात्री भरधाव कारच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली.
Dona Paula Accident
Goa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Dona Paula Accident : दोनापावल-बांबोळी मार्गावर रविवारी मध्यरात्री भरधाव कारच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या भीषण अपघातात दीक्षा परवाडकर (२३, रा. मिरामार) हिचा मृत्यू झाला, तर डी. अरुण कुमार (२६, रा. मडगाव) गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

दोनापावल जंक्शनवर वळण घेत असलेल्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी जबर होती की दुचाकी तब्बल १०० मीटर दूर फेकली गेली.यात कारच्या एअरबॅग्सही उघडल्या.

Dona Paula Accident
Goa Unemployment Rate: गोव्यात बेरोजगारी 8.3 टक्के! युवकांना रोजगार देण्यात भाजप सरकार अपयशी, काँग्रेसची टीका

दरम्यान, दोघेही सिदाद दी गोवा हॉटेलमधील काम आटोपून घरी परतताना ही दुर्घटना घडली. कार चालक डारियस डायस (२१,वास्को) विरुद्ध बीएनएस कलम १०६ (१)अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. प्राथमिक तपासात मद्यपान नसल्याचे स्पष्ट झाले तरी वेग व निष्काळजीपणाच अपघातास कारण ठरल्याचे दिसते.

Dona Paula Accident
Goa Marine Export: सागरी निर्यातीत घट, महसुलात वाढ; गोव्यात निर्यातीला मोठा फटका, दरवाढीमुळे एकूण उत्पन्नात वाढ

मार्ग बनला ‘रेसिंग ट्रॅक’

दोनापावल ते बांबोळी हा मार्ग ‘रेसिंग ट्रॅक’ बनल्याचा आरोप करत स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. रात्रीच्या वेळी येथे सर्रास शर्यती लावल्या जातात. महिन्यातून किमान दोन अपघात होत असल्याचा दावा स्थानिकांनी केला असून, प्रशासनाने तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी जोरदार मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com