Goa Unemployment Rate: गोव्यात बेरोजगारी 8.3 टक्के! युवकांना रोजगार देण्यात भाजप सरकार अपयशी, काँग्रेसची टीका

Goa Unemployment Rate 8.3 Percent: सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेच्या (पीएलएफएस) ताज्या निष्कर्षांमुळे गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे अपयश पूर्णपणे उघड झाले आहे.
Goa Unemployment Rate
Goa Unemployment RateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेच्या (पीएलएफएस) ताज्या निष्कर्षांमुळे गोव्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे अपयश पूर्णपणे उघड झाले आहे.

गोव्यात बेरोजगारी दर ८.३ टक्के इतका नोंदवला गेला असून, तो राष्ट्रीय सरासरी ३.१ टक्क्यांपेक्षा खूपच जास्त आहे. ही केवळ आकडेवारी नसून, राज्यातील युवकांसाठी रोजगार निर्माण करण्यात भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा स्पष्ट पुरावा आहे, असा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेसचे मीडिया चेअरमन अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

भाजप सरकारच्या नेत्यांनी वर्षानुवर्षे विकास, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.

Goa Unemployment Rate
Goa Marine Export: सागरी निर्यातीत घट, महसुलात वाढ; गोव्यात निर्यातीला मोठा फटका, दरवाढीमुळे एकूण उत्पन्नात वाढ

गोव्यातील सुशिक्षित युवक रोजगाराच्या शोधात भटकत आहेत. पात्र व्यक्तींना नोकऱ्या मिळत नाहीत आणि कुटुंबांमध्ये अनिश्चितता वाढत आहे. भाजप सरकार आपल्या आश्वासनांना वास्तवात उतरवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असे पणजीकर यांनी नमूद केले आहे.

Goa Unemployment Rate
Goa Taxi Issue: दक्षिण गोव्यात स्थानिक टॅक्सीचालक आक्रमक, ऑनलाईन टॅक्सीसेवेला तीव्र विरोध; पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन

भाजप सरकारच्या निष्क्रियतेचा आणि अकार्यक्षमतेचा आम्ही तीव्र निषेध करतो. गोव्याच्या जनतेला उत्तरदायित्व हवे आहे आणि त्यांना उत्तरे हवी आहेत. आता वेळ आली आहे की जनतेने या अपयशाची सरकारला जाणीव करून देण्याची.

तसेच गोव्याच्या युवकांचे भविष्य राजकीय दिखावा आणि पोकळ आश्वासनांसाठी बळी देऊ नये, जनतेने विचार करावी, असे आवाहन पणजीकर यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com