

वास्को: सडा ते हार्बर मार्गावरील रस्ता रुंदीकरण आणि संरक्षक भिंत उभारणीचे काम सुरू असताना सोमवारी सकाळी अचानक मोठी दरड कोसळून मनोरंजन मिंद या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. अन्य तीन कामगारांनी प्रसंगावधान राखत सुरक्षित स्थळी धाव घेतली; मात्र त्यातील एकजण जखमी झालाच. सदर मार्ग अरुंद असल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीत अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे डोंगर द्रड कोसळल्यानंतर मदतकार्य सुरू असताना.
पावसामुळे माती झाली ठिसूळ ,रविवारी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे डोंगरावरील माती सैल आणि ठिसूळ झाली होती. त्यामुळे डोंगरकापणी सुरू असताना अचानक दरड कोसळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिकांनीही या भागात सुरक्षिततेच्या उपाययोजना अधिक काटेकोरपणे राबवण्याची मागणी केली आहे.
कापून रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. दरड कोसळू नये यासाठी संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. दरड कोसळत असल्याची चाहूल लागताच संरक्षक भिंतीच्या बाहेरील बाजूस काम करणाऱ्या तीन कामगारांनी पळ काढला. मात्र भिंतीमागील बाजूस काम करणारा मनोरंजन मिंद याच्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड कोसळल्याने तो ढिगाऱ्याखाली गाडला गेला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.