UAE Air Defences Shooting Iran Drone Dainik Gomantak
ग्लोबल

VIDEO: "इराणी ड्रोनचा हवेतच चक्काचूर'' 238 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा पाऊस, पण युएईच्या संरक्षण दलानं दाखवली ताकद; थरारक व्हिडिओ व्हायरल

UAE Ministry of Defense Video: युएईच्या संरक्षण मंत्रालयाने या थरारक कारवाईचा 40 सेकंदांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला.

Manish Jadhav

UAE Air Defences Shooting Iran Drone: पश्चिम आशियातील तणाव आता एका नव्या आणि भीषण वळणावर येऊन पोहोचला. इराणने संयुक्त अरब अमिरातीच्या दिशेने शेकडो क्षेपणास्त्रे आणि आत्मघाती ड्रोन डागून मोठा हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग दाटले असून परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. रविवारी (8 मार्च) झालेल्या या ताज्या हल्ल्यात युएईच्या हवाई संरक्षण दलाने अत्यंत चपळाईने 16 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि 113 मानवरहित विमाने आकाशातच नष्ट केली.

युएईच्या (UAE) संरक्षण मंत्रालयाने या थरारक कारवाईचा 40 सेकंदांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून त्यामध्ये अमिरातीचे एअर डिफेन्स सिस्टिम इराणी ड्रोन्सना हवेतच कसे टिपत आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे.

युएईच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, इराणकडून होत असलेल्या या हल्ल्यांची तीव्रता प्रचंड आहे. एअर डिफेन्सने एकूण 17 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा शोध लावला होता, त्यापैकी 16 क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात यश आले, तर एक क्षेपणास्त्र समुद्रात पडले. त्याचप्रमाणे, 117 ड्रोनपैकी 113 ड्रोन यशस्वीपणे इंटरसेप्ट करण्यात आले, तर उर्वरित 4 ड्रोन देशाच्या काही भागांत कोसळले. इराणकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या एकूण हल्ल्यांचा विचार केला तर ही आकडेवारी धडकी भरवणारी आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, इराणने (Iran) आतापर्यंत एकूण 238 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. यातील 221 क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात आली असून 15 समुद्रात पडली आहेत, तर केवळ 2 क्षेपणास्त्रे देशाच्या जमिनीवर कोसळली आहेत. याशिवाय तब्बल 1,422 इराणी ड्रोन (UAV) शोधण्यात आले, ज्यातील 1,342 ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले आणि 80 ड्रोन विविध भागात पडले आहेत. तसेच 8 क्रूझ क्षेपणास्त्रेही शोधून नष्ट करण्यात आली आहेत.

या भीषण हल्ल्यांमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता युएई प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. ज्या भागात ड्रोन किंवा क्षेपणास्त्रांचे अवशेष पडले आहेत, त्या घटनास्थळांचे, प्रतिबंधित क्षेत्रांचे किंवा विमानतळांच्या आतील भागांचे फोटो किंवा व्हिडिओ विनापरवाना काढणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. संवेदनशील माहिती शत्रूच्या हाती लागू नये आणि अफवांना आळा बसावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

दुसरीकडे, युएईमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था पाहता अबुधाबीतील भारतीय दूतावास (Indian Embassy) सतर्क झाले आहे. तिथे वास्तव्यास असलेल्या लाखो भारतीय नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. भारतीय दूतावासाने नागरिकांना आवाहन केले की, जेव्हा जेव्हा धोक्याचा सायरन किंवा अलर्ट ऐकू येईल, तेव्हा तातडीने सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. जोपर्यंत प्रशासनाकडून ग्रीन सिग्नल मिळत नाही, तोपर्यंत बाहेर पडू नये. विशेषतः हल्ल्यांचे व्हिडिओ काढण्यासाठी किंवा फोटो घेण्यासाठी बाहेर जाण्याचे धाडस करु नका, असा इशाराही देण्यात आला.

तसेच, जर आपल्या परिसरात क्षेपणास्त्रांचे अवशेष किंवा कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास त्याला स्पर्श न करता तात्काळ संबंधित सुरक्षा यंत्रणांना कळवावे, असे दूतावासाने स्पष्ट केले आहे. या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेवर आणि तेलाच्या किमतींवरही मोठे परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आधी पाण्यासाठी तडफडला, आता महापुराची भीती! निसर्गाच्या दुहेरी चक्रव्यूहात अडकला पाकिस्तान; भारताकडून कोणताही डेटा मिळेना

King Cobra Viral Video: 'स्टंट' पडला महागात! किंग कोब्राला किस करण्यासाठी झुकला अन् क्षणार्धात जीवघेणा हल्ला; व्हिडिओ पाहून अंगावर काटा

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी! रिपोर्ट कधी जाहीर होणार आणि पगारात किती वाढ होणार? जाणून घ्या सर्व काही

'वो दबाव नहीं, सम्मान का हकदार है...', रोहितच्या निवृत्तीच्या वृत्ताने माजी क्रिकेटपटू संतापला; गंभीर-अजित टार्गेटवर

Guru Gochar 2026: नक्षत्रांचा राजा आणि देवगुरुंची युती! 'या' 5 राशींच्या आयुष्यात सुरु होणार सोन्यासारखा काळ; व्यवसायात नव्या आयडिया ठरतील सुपरहीट

SCROLL FOR NEXT