Israel Iran Tensions: पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी इस्रायलचे 'मोदी सरकार' ला आवाहन!

Israel Iran Tensions: एकीकडे इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये तर दुसरीकडे इस्त्रायल आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे.
PM Narendra Modi And Benjamin Netanyahu
PM Narendra Modi And Benjamin NetanyahuDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Israel Iran Tensions: एकीकडे इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये तर दुसरीकडे इस्त्रायल आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने आपला ‘मित्र’ भारताकडे मदतीचे आवाहन केले आहे. नवी दिल्लीतील इस्रायलचे राजदूत नाओर गिलन म्हणाले की, पश्चिम आशियातील शांततेसाठी भारताने इराणला रोखावे अशी आमची अपेक्षा आहे. इस्रायलवरील ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर नवी दिल्लीने मित्र म्हणून पाऊल उचलावे आणि तेहरानला पश्चिम आशियाला अस्थिर करण्यापासून रोखावे अशी मागणी इस्रायली राजदूताने केली. इस्रायली दूतावासात पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गिलन म्हणाले की, इस्रायल मजबूत आहे आणि गरज पडल्यास अलीकडच्या हल्ल्यानंतर तो इराणचा सामना करेल.

इस्रायलचे राजदूत म्हणाले की, पश्चिम आशियामध्ये स्थिरता आणण्यासाठी भारताने भूमिका बजावली पाहिजे. पश्चिम आशिया हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रदेश आहे कारण लाखो भारतीय येथे काम करतात. संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि कतार यांच्याशी मजबूत व्यापारी संबंध आहेत. मला वाटते की इराणला रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाचा एक भाग म्हणून भारत सक्रिय होईल. त्यांनी पुढे सांगितले की, गोष्टी सामान्य करण्यासाठी भारताने हस्तक्षेप करावा.

PM Narendra Modi And Benjamin Netanyahu
Israel Iran Tensions: तिसऱ्या महायुद्धाचं सावट; इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे जगात तणावाचं वातावरण

इस्रायलला भारताकडून आशा आहेत

भारतीय परराष्ट्रमंत्र्यांची इस्रायल आणि इराणमधील आपल्या समकक्षांशी चर्चा पाहता भारताकडून काय भूमिका अपेक्षित आहे, असा प्रश्न इस्रायलच्या राजदूताला विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, "मला वाटते की एक मित्र या नात्याने आम्ही अपेक्षा करतो की भारत इराणने पश्चिम आशियात निर्माण केलेल्या युद्धजन्य परिस्थितीवर रोख लावण्यासाठी मदत करेल."

PM Narendra Modi And Benjamin Netanyahu
Israel Iran Tensions: इराण येत्या 48 तासांत इस्रायलवर हल्ला करु शकतो; वॉल स्ट्रीट जर्नलचा खळबळजनक दावा

गिलन म्हणाले की, इराणने इस्रायलवर 350 क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. 99 टक्के क्षेपणास्त्रे आणि ड्रोन रोखल्याबद्दल त्यांनी अमेरिका आणि प्रदेशातील इतर मित्रांसह इस्रायलच्या हवाई संरक्षण आणि हवाई दलाच्या प्रचंड क्षमतेचे आभार मानले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. इस्रायलच्या दक्षिणेतील फक्त एक 7 वर्षांची मुलगी जखमी झाली. ती लवकरच बरी होण्याची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Strait Of Hormuz Cargo Ship Accident
Narendra Modi 25 years in government
South Western Railway Coal Transport
Monsoon Withdrawal From Rajasthan
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com