Haryana Gang War: पोलिस चौकीपासून 50 पावलांवर रक्तरंजित थरार! जेवणाच्या टेबलावरच तीघांचा मृत्यू, एकाचा पाठलाग करुन झाडल्या गोळ्या; रोहतक हादरले

Rohtak Milan Dhaba Gang War Firing Four Killed: हरियाणातील रोहतक जिल्ह्यात मिलन ढाब्यावर गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात चार तरुणांचा मृत्यू झाला.
Rohtak Milan Dhaba Gang War Firing Four Killed
Haryana Gang WarDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Rohtak Milan Dhaba Gang War Firing Four Killed: हरियाणातील रोहतक जिल्ह्यात मिलन ढाब्यावर गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या गोळीबारात चार तरुणांचा मृत्यू झाला. खरावड पोलिस चौकीपासून अवघ्या पन्नास पावलांवर रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी हा गोळीबार केला. यामध्ये तीन तरुणांचा जेवणाच्या टेबलावरच मृत्यू झाला, तर एका तरुणाचा पाठलाग करुन जीव जाईपर्यंत त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

अचानक झालेल्या गोळीबारामुळे ढाब्यावर मोठी खळबळ उडाली आणि ग्राहकांची पळापळ सुरु झाली. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी टेबल आणि खुर्च्यांचा आधार घेतला. ढाब्याच्या मालकाने कळवल्यानंतर महामार्ग गस्त पथक आणि आसपासच्या पोलिस ठाण्यांची पथके घटनास्थळी पोहोचली, मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले. पोलिसांनी चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टसाठी पाठवले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.

Rohtak Milan Dhaba Gang War Firing Four Killed
Delhi Crime: ज्या सहकाऱ्यांसोबत पार्टी केली, तेच बनले सैतान! दिल्लीतील कॅफेत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; दोघांना अटक अन् तिघांचा शोध सुरु

मृत तरुणांची ओळख पटली असून, त्यामध्ये डिघल येथील रिंकू (जगबीर यांचा मुलगा), विनीत (जयबीर यांचा मुलगा), गन्जू आणि बेरी येथील हिमांशु (राजबीर यांचा मुलगा) यांचा समावेश आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, गोळीबारानंतर हल्लेखोर काही वेळ शस्त्रे फिरवत घटनास्थळीच वावरत होते आणि त्यानंतर कारमधून निघून गेले.

Rohtak Milan Dhaba Gang War Firing Four Killed
Crime News: रेल्वेत 54 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या; सोन्याच्या एका अंगठीने उलगडलं हत्येचं गूढ, 6 तासांत आरोपी जेरबंद

घटनेची माहिती मिळताच रोहतक रेंजचे आयजी हमिद अख्तर आणि एसपी गौरव राजपुरोहित यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी मध्यरात्रीच घटनास्थळी दाखल झाले. सीआयए, स्पेशल सेल आणि एफएसएल पथकांनी पुरावे गोळा केले. भाऊ रिटोलिया आणि सन्नी रिटोलिया टोळ्यांमधील वैमनस्यातून तसेच डिघल गावातील मागील एका हत्येच्या घटनेशी या प्रकरणाचा संबंध असण्याची शक्यता पोलिसांनी (Police) वर्तवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ashve Mandrem Police Action Controvers
Goa Crime News
Manipur Ukhrul District Violence Four Naga Killed
Diwali Fire Accident