Iran US War: ''सार्वभौमत्वावर घाला घालाल तर...'' इराणी राष्ट्राध्यक्षानं ट्रम्पला दिला सज्जड दम; 'आर-पार'च्या लढाईचा व्यक्त केला निर्धार!

Iran President Pezeshkian: इस्रायल आणि अमेरिकेसोबत सुरु असलेल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला.
Iran President Pezeshkian & Donald Trump
Iran President Pezeshkian & Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

Masoud Pezeshkian Interview: इस्रायल आणि अमेरिकेसोबत सुरु असलेल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता पेझेश्कियान यांनी त्यांना कडक शब्दांत सुनावले असून "इराण आपली एक इंचही जमीन कोणाला घेऊ देणार नाही," असा ठाम निर्धार व्यक्त केला. इराणच्या प्रादेशिक अखंडतेवर आणि सार्वभौमत्वावर होणारा कोणताही घाला खपवून घेतला जाणार नाही, असा संदेश त्यांनी जागतिक समुदायाला देखील दिला.

प्रेस टीव्हीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी रविवारी (8 मार्च) इराणच्या संरक्षण धोरणाबाबत महत्त्वाची भूमिका मांडली. सध्या अमेरिका आणि इस्रायल इराणवर सातत्याने हवाई हल्ले करत आहेत आणि इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य केले जात आहे. या संकटाचा उल्लेख करताना राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, "आव्हाने कितीही मोठी असली तरी आम्ही आमच्या देशाच्या भौगोलिक सीमांचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहोत. इराणने कधीही कोणावर आधी आक्रमण केलेले नाही, मात्र जेव्हा आमच्या संरक्षणाचा प्रश्न येतो, तेव्हा आम्ही मागे हटणार नाही." त्यांच्या या विधानामुळे इराण आपल्या लष्करी धोरणात अधिक कठोर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Iran President Pezeshkian & Donald Trump
US-Israel Attacks Iran: अमेरिका- इस्रायलचा इराणवर हल्ला! 148 मुलींचा मूत्यू, सगळीकडे रक्ताचा सडा Watch Video

पेझेश्कियान यांनी शेजारील देशांनाही स्पष्ट ताकीद दिली. इराण हा शांतताप्रिय देश असून आम्हाला प्रादेशिक स्थैर्य हवे आहे, असे सांगतानाच त्यांनी एक गंभीर अट घातली. जर कोणत्याही शेजारील देशाने आपली भूमी अमेरिका किंवा इस्रायलला इराणवर हल्ला करण्यासाठी वापरु दिली, तर इराण त्या देशावर जशास तसे उत्तर देण्यास किंवा मोठी लष्करी कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही.

यापूर्वी इराणने काही खाडी देशांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्याबद्दल पेझेश्कियान यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, आता त्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत शेजारील देशांकडून धोका निर्माण होत नाही, तोपर्यंत इराण शांत राहील, अन्यथा परिणाम भीषण होतील.

Iran President Pezeshkian & Donald Trump
Israel US Attack on Iran: मध्यपूर्वेत युद्धाचा वणवा पेटला! भारतीय नागरिकांसाठी 'ट्रॅव्हल ॲडव्हायजरी' जारी; सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या इराणविरोधी धोरणांवर प्रहार करताना पेझेश्कियान म्हणाले की, शत्रूला वाटते की इराण दबावाखाली येऊन आत्मसमर्पण करेल, पण त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. "इराणला गुडघ्यावर आणण्याचे शत्रूचे स्वप्न ते आपल्यासोबतच थडग्यात घेऊन जातील," अशा कडक शब्दांत त्यांनी ट्रम्प यांच्या धोरणांची खिल्ली उडवली. इराणची जनता एकजूट असून कोणत्याही परकीय शक्तीच्या धमक्यांना घाबरणारी नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय कायदे आणि मानवाधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या आक्रमक देशांवर त्यांनी सडकून टीका केली.

Iran President Pezeshkian & Donald Trump
Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

इराणच्या (Iran) लष्करी प्रमुखांनी यापूर्वीच देशाच्या संरक्षणासाठी मोठी तयारी केल्याचे जाहीर केले होते, आता राष्ट्राध्यक्षांच्या या विधानामुळे इराणचे राजकीय नेतृत्वही युद्धाच्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट झाले. पश्चिम आशियातील हा संघर्ष आता केवळ दोन देशांपुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर चिंतेचा विषय बनला. इराणने आपल्या 'स्वाभिमान आणि सार्वभौमत्वा'ची जी रेषा आखली, ती ओलांडण्याचा प्रयत्न झाल्यास संपूर्ण प्रदेश युद्धाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com