Bayangini Waste Management Project: 140 कोटींचा प्रकल्प कागदावरच; बायंगिणीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पाला आणखी 6 महिन्यांचा विलंब?

Goa Waste Management Corporation: प्राप्त झालेल्या प्रस्तावांमधील तांत्रिक कागदपत्रांची छाननी करण्यात येणार असून, त्यानंतर पात्र ठरणाऱ्या कंपन्यांचे आर्थिक प्रस्ताव उघडले जातील.
Goa Waste Management Corporation
Bayangini Waste Management ProjectDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: बायंगिणी येथे उभारण्यात येणाऱ्या १०० टन प्रतिदिन क्षमतेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने (जीडब्ल्यूएमसी) प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कामासाठी तीन कंपन्यांनी प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामध्ये मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड, पॉल्युकेअर इंजिनिअर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि शाह टेक्निकल कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे.

प्राप्त झालेल्या प्रस्तावांमधील तांत्रिक कागदपत्रांची छाननी करण्यात येणार असून, त्यानंतर पात्र ठरणाऱ्या कंपन्यांचे आर्थिक प्रस्ताव उघडले जातील. ही कागदपत्रे तपासण्याची प्रक्रिया पुढील १५ दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आर्थिक प्रस्तावांचे मूल्यमापन झाल्यानंतर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती केली जाईल.

Goa Waste Management Corporation
Goa Politics: गोवा फॉरवर्डसोबत युतीच्या चर्चेला दिल्‍लीत सकारात्मक वळण, काँग्रेसचा सावध आशावाद; पुढील बैठक निर्णायक

मात्र, सल्लागार नियुक्तीच्या प्रक्रियेमुळे बायंगिणीतील १४० कोटी रुपये खर्चाच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला आणखी 6 महिन्यांचा विलंब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. फेब्रुवारी २०२७ मध्ये होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापर्यंत ही प्रक्रिया लांबण्याचीही शक्यता आहे.

सल्लागाराची भूमिका मोठी

या प्रकल्पासाठी नियुक्त प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला डीपीआर, व्यवहार्यता अहवाल आणि अभियांत्रिकी आराखडे तयार करावे लागतील. तसेच कंत्राटदार निवडीसाठी निविदा प्रक्रिया राबविणे, सवलत करार तयार करणे, निविदांचे मूल्यमापन आणि बांधकामावर देखरेख ठेवणे, या जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतील. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर यंत्रणेची कार्यान्वित चाचणी, प्रायोगिक संचालन आणि कामगिरीची हमी चाचणी पूर्ण होईपर्यंत सल्लागाराची नियुक्ती कायम राहील.

सहा कंपन्या स्पर्धेत

बायंगिणी प्रकल्पाच्या उभारणीसाठी सहा कंपन्या स्पर्धेत आहेत. त्यात हैदराबाद इंटिग्रेटेड एमएसडब्ल्यू, हिंदुस्तान वेस्ट ट्रीटमेंट, ३आर मॅनेजमेंट, श्रीनिवास वेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस, ऑर्गॅनिक रिसायकलिंग सिस्टिम्स आणि एचएनबी इंजिनिअर्स यांचा समावेश आहे. दरम्यान, गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी चेन्नई, सोलापूर आणि अहमदाबाद येथील प्रकल्पांना भेटी देऊन कचरा प्रक्रिया पद्धती, यंत्रणेचे कार्य आणि गोव्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा अभ्यास केला आहे.

Goa Waste Management Corporation
Goa Politics: 'मनोज परब प्रसिद्धीसाठी धडपडत आहेत'; विजय सरदेसाईंचा आरजीपी नेत्याला टोला

‘पीपीपी’ तत्त्वावर उभारणी

बायंगिणी कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची संकल्पना २००८ मध्ये पुढे आली. त्यावेळी पणजी महानगरपालिकेने जमीन संपादित केली होती. २०१७ मध्ये ती गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाकडे हस्तांतरित झाली. प्रकल्पाची सार्वजनिक सुनावणी आणि पर्यावरणीय मंजुरी पूर्ण झाली आहे. आता सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. सुमारे १४० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर ‘डीबीएफओटी’ पद्धतीने उभारण्यात येणार आहे. प्रत्यक्ष कामाला सुरवात होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.