China Arrivals Dainik Gomantak
ग्लोबल

10 Nations: भारतासह 'या' 10 देशांनी चीनमधून येणाऱ्यांवर घातले निर्बंध, प्रवेशासाठी ठेवल्या या अटी

Alert For China Arrivals: कोरोनाचा धोका लक्षात घेता भारत, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्ससह अनेक देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे.

दैनिक गोमन्तक

Restrictions Imposed By 10 Nations On Passengers From China: कोरोनाचा धोका लक्षात घेता भारत, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्ससह अनेक देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. या देशांमध्ये चिनी प्रवाशांच्या प्रवेशासाठी अटी घालण्यात आल्या आहेत. नवीन नियमांनुसार, चीनमधून कोणताही प्रवासी या देशांमध्ये आल्यास त्याला कोविडचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे बंधनकारक असेल, अन्यथा त्याला देशात प्रवेश करता येणार नाही. खरे तर, चीनमध्ये जीरो कोविड पॉलिसी शिथिल केल्यानंतर, कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

दरम्यान, या बंदी घालणाऱ्या देशांनी चीनवर (China) कोरोनामुळे मृत्यू, रुग्णांची वाढती संख्या आणि संभाव्य नवीन व्हेरिएंटबाबत खरी माहिती दिली नसल्याचा आरोप केला आहे. मात्र, चीनचा दावा याच्या विरुद्ध आहे. चीनचे म्हणणे आहे की, 'या निर्बंधांमागील खरा हेतू चीनचे तीन वर्षांचे कोविड नियंत्रण मोडून काढणे आणि देशाच्या व्यवस्थेवर हल्ला करणे हा आहे.' अमेरिकेने जारी केलेल्या नव्या निर्देशांनंतर चीनचे हे वक्तव्य आले आहे.

या 10 देशांनी चीनमधून येणाऱ्या लोकांवर निर्बंध लादले आहेत

भारत

चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी भारताने निगेटीव्ह रिपोर्ट अनिवार्य केला आहेत. या देशांतील प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास किंवा चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना क्वारंटाईन करावे लागेल आणि चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना सोडण्यात येईल.

अमेरिका

अमेरिकेने (America) 5 जानेवारीपासून चीनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड चाचणी अहवाल अनिवार्यपणे लागू केला आहे. नवीन नियमानुसार, चीन, हाँगकाँग किंवा मकाऊ येथून अमेरिकेला जाणाऱ्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागेल. यासोबतच हा अहवाल दोन दिवसांपेक्षा जुना नसावा, असेही बंधनकारक आहे.

ब्रिटन

5 जानेवारीपासून चीनमधून इंग्लंडला येणाऱ्या प्रवाशांना कोरोनाचा निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट दाखवणे बंधनकारक असेल. अहवाल दोन दिवसांपेक्षा जुना नसावा, हेही आवश्यक आहे. तथापि, चीनहून स्कॉटलंड, वेल्स किंवा उत्तर आयर्लंडला थेट उड्डाणे नाहीत.

फ्रान्स

फ्रान्सने चीनमधून येणाऱ्या लोकांना प्रस्थान करण्यापूर्वी 48 तासांच्या आत निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट दाखवणे बंधनकारक केले आहे. हा नियम 1 जानेवारीपासूनच लागू होणार आहे. तथापि, फ्रान्समध्ये येणाऱ्या काही प्रवाशांना या कालावधीत विमानतळावर कोरोना चाचणी करावी लागेल.

इटली

इटलीने चीनमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी कोविड अँटीजेन स्वॅब आणि व्हायरस सिक्वेन्सिंगचे आदेश दिले आहेत. मालपेन्सा, मिलानच्या मुख्य विमानतळाने आधीच बीजिंग आणि शांघाय येथून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी सुरु केली आहे. रिपोर्ट्सनुसार, येथे येणारे 50 टक्के चिनी प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

स्पेन

चीनमधून स्पेनला येणाऱ्या प्रवाशांना आता आगमनाच्या वेळी निगेटीव्ह कोविड रिपोर्ट दाखवावा लागेल किंवा रोगाविरूद्ध संपूर्ण लसीकरण प्रमाणपत्र दाखवावे लागेल.

मलेशिया

मलेशिया येथे येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी केली जाईल. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा मागोवा घेण्यासाठी प्रवाशांची चाचणी करण्यापेक्षा सांडपाणी चाचणी हा एक चांगला मार्ग आहे.

दक्षिण कोरिया

दक्षिण कोरियाने म्हटले आहे की, चीनमधून प्रवाशांना प्रस्थान करण्यापूर्वी निगेटीव्ह कोविड टेस्ट रिपोर्ट दाखवणे बंधनकारक असेल.

इस्रायल

चीनमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागेल, असेही इस्रायलने जाहीर केले आहे.

जपान

हाँगकाँगच्या लोकांसाठी जपान हे सर्वोत्तम डेस्टिनेशन मानले जाते. यामुळेच जपानने येथून येणाऱ्या विमानांची संख्या मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 21 जानेवारीपासून सुरु होणार्‍या लूनर न्यू ईयर हॉलिडेच्या सुट्टीपूर्वी सर्वाधिक प्रवासाच्या हंगामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. येथे चीनमधून येणाऱ्या सर्व लोकांसाठी कोरोना टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना 7 दिवस क्वारंटाईन करावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT