Pramod Yadav
थिंकटँक ग्लोबल फायर पॉवरमध्ये चीनला जगातील तिसरी सर्वात मोठी शक्तीशाली सेना मानले असून, भारत चौथ्या स्थानावर आहे.
दोन्ही देशांची तुलना 46 विविध मुद्यांवर करण्यात आली असून, यात 38 गोष्टींमध्ये चीन भारताच्या पुढे आहे.
चीन जवळ 20 लाखाहून अधिक मोठी सेना असून भारताकडे 14 लाख 50 हजार सैनिक आहेत.
भारताकडे 25 लाख 27 हजार निमलष्करी सैन्य असून, चीनकडे केवळ सहा लाख 24 हजार निमलष्करी सैन्य आहे.
भारत देशाच्या सुरक्षेवर 5.50 लाख कोटी रूपये खर्च करते तर, चीन भारताच्या तिप्पट म्हणजेच 230 अब्ज कोटी खर्ज करते.
चीन जवळ 1,200 लढाऊ विमाने आहेत तर, भारताकडे 564 लढाऊ विमाने आहेत. भारताकडे एकूण 2,182 विमाने असून चीनकडे 3,285 विमाने आहेत.
भारताकडे 4,614 रणगाडे असून, चीनकडे 5,250 रणगाडे आहेत.
विमानवाहू क्षमता असलेले फक्त एक जहाज भारताकडे असून चीन अशी दोन जहाचे आहेत.
अलिकडे भारत आणि चीनच्या सीमेवर तवांग येथे जवानांमध्ये झटापटी झाली होती.