America and China News : अमेरिका-चीन संघर्षात नेपाळची गोची

दोन्ही देश ज्या प्रकारे नेपाळच्या अंतर्गत बाबींवर उघडपणे वक्तव्ये करत आहेत आणि नेपाळ यावर ज्या प्रकारे मौन बाळगून आहेत ते पाहून येथील निरीक्षक आश्चर्यचकित झाले आहेत.
America vs China
America vs ChinaDainik Gomantak

अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात नेपाळ कसा अडकत चालला आहे,याचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे. दोन्ही देश ज्या प्रकारे नेपाळच्या अंतर्गत बाबींवर उघडपणे वक्तव्ये करत आहेत आणि नेपाळ यावर ज्या प्रकारे मौन बाळगून आहेत ते पाहून येथील निरीक्षक आश्चर्यचकित झाले आहेत.

या नव्या वादात अमेरिकेचे नेपाळमधील राजदूत डीन आर. थॉम्पसन यांच्या विधानाने संताप व्यक्त होत आहे. थॉम्पसन यांनी गेल्या काही दिवसात सांगितले की ते नेपाळ सरकारला तिबेट मधील लोकांसह सर्व रहिवासी यांच्या हितासाठी काम करण्यास प्रोत्साहित करतील

त्यानंतर,यूएस सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीसमोर,त्यांनी सांगितले की नेपाळने "चीनच्या प्रचार मोहिमेला" न जुमानता अमेरिकन संस्था मिलेनियम चॅलेंज कॉर्पोरेशन (एमसीसी) कडून $ 500 दशलक्ष मदत स्वीकारण्याच्या कराराला संसदीय मान्यता दिली.

आता या विधानावर चीनने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. काठमांडूतील चीनच्या राजदूताने एका निवेदनात अमेरिकेने नियुक्त केलेल्या राजदूताचे वक्तव्य पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे. दूतावासाने म्हटले की 'अमेरिकेच्या राजदूताने केवळ चीनचीच निंदा केली नाही, तर नेपाळ आणि नेपाळी लोकांचाही अपमान केला आहे.

America vs China
Google Doodle Today: गूगलची डूडलची Oskar Sala यांना अनोखी श्रद्धांजली; 'वन मैन ऑर्केस्ट्रा' बद्दल वाचा एका क्लिकवर

थॉम्पसन यांनी अमेरिकेच्या सिनेट समितीसमोर त्यांचे विधान केले जेव्हा त्यांच्या नियुक्तीची पुष्टी करण्यासाठी सुनावणी सुरू झाली. समितीने त्यांची नियुक्ती निश्चित केली, तरच ते राजदूत म्हणून पदभार स्वीकारू शकतील.

चिनी दूतावासाचे प्रवक्ते वांग शियालोंग यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कोणत्याही देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये बाहेरून हस्तक्षेप होता कामा नये. त्याच्यावर कोणतीही राजकीय अट लादली जाऊ नये आणि त्याला धमकावण्याची कूटनीती केली जाऊ नये.स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व आणि हिताच्या विरोधात पावले उचलली जाऊ नयेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com