"शून्यावर बाद झालास तरी टेन्शन नको!", गौतम गंभीरच्या 'या' सल्ल्यानं अभिषेक शर्मा चमकला; वेस्ट इंडिजविरुद्ध ठरणार 'एक्स फॅक्टर'

IND vs WI, T20 World Cup 2026: वेस्ट इंडिजविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या सुपर-८ सामन्यापूर्वी भारतीय गोटातून आनंदाची बातमी समोर आली आहे.
IND vs WI, T20 World Cup 2026
IND vs WI, T20 World Cup 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

वेस्ट इंडिजविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या सुपर-८ सामन्यापूर्वी भारतीय गोटातून आनंदाची बातमी समोर आली आहे. युवा सलामीवीर अभिषेक शर्माने झिम्बाब्वेविरुद्ध ३० चेंडूत ५५ धावांची धडाकेबाज खेळी करत फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, या यशाचे श्रेय त्याने स्वतःपेक्षा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या विश्वासाला दिले आहे. अभिषेकच्या या खेळीमुळे भारताची सलामीची जोडी आता विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सज्ज झाली आहे.

गंभीर आणि सूर्याचा 'तो' विश्वास ठरला गेमचेंजर

अभिषेक शर्माने आपल्या कामगिरीबद्दल बोलताना सांगितले की, संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर दाखवलेला विश्वास अभूतपूर्व होता. अभिषेक म्हणाला, "मला माझ्यावर जेवढा विश्वास नव्हता, त्यापेक्षा जास्त विश्वास प्रशिक्षक गंभीर आणि सूर्या भाईला होता. त्यांनी मला मानसिकदृष्ट्या खंबीर केले. गंभीर सरांनी मला स्पष्ट सांगितले होते की, 'जरी तू पुढच्या सामन्यात पुन्हा शून्य धावांवर बाद झालास, तरी संघात तुझी जागा कायम असेल आणि तूच खेळशील.' या एका वाक्याने माझे दडपण दूर झाले आणि मी मोकळेपणाने खेळू शकलो."

सेमीफायनलचे तिकीट आणि 'करो या मरो'ची लढत

टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला आजचा वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे. आतापर्यंत इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या तीन संघांनी उपांत्य फेरीत आपली जागा निश्चित केली आहे. चौथ्या जागेसाठी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात थेट लढत असून, जो जिंकेल तो संघ अंतिम चारमध्ये प्रवेश करेल. पाकिस्तान आधीच स्पर्धेतून बाहेर पडल्याने भारतासाठी ही सुवर्णसंधी आहे.

भारतात रंगणार उपांत्य फेरीचा थरार

पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे आता विश्वचषकाचे दोन्ही उपांत्य फेरीचे सामने भारतात होणार हे निश्चित झाले आहे. ४ आणि ५ मार्च रोजी कोलकाता आणि मुंबई या दोन ऐतिहासिक शहरांमध्ये हे सामने रंगणार आहेत. जर आज भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला, तर भारतीय चाहत्यांना घरच्या मैदानावर टीम इंडियाला खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. अभिषेक शर्माची आक्रमक फलंदाजी भारताला पॉवरप्लेमध्ये मोठी धावसंख्या उभारून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com