India China Faceoff: तवांग फेसऑफने पुन्हा आठवण करुन दिली... गलवान खोऱ्यातील खूनी झडप!

India-China Clash: भारत आणि चीन पुन्हा एकदा भिडले आहेत. यावेळी अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये ही चकमक झाली.
Galwan Valley
Galwan ValleyDainik Gomantak
Published on
Updated on

India-China Clash: भारत आणि चीन पुन्हा एकदा भिडले आहेत. यावेळी अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये ही चकमक झाली. भारतीय सैनिक आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये अनेक सैनिक जखमी झाले आहेत. या वृत्ताबाबत भारतीय लष्कराच्या अधिकृत वक्तव्याची प्रतीक्षा केली जात आहे.

याआधी, 2021 मध्ये अरुणाचल प्रदेशातील यांगसे भागात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये वाद झाला होता. सध्या तवांग चकमकीसंदर्भात जी माहिती समोर आली आहे, त्यात 30 हून अधिक भारतीय जवान किरकोळ जखमी झाले आहेत. तर त्याचवेळी चीनचे (China) अनेक सैनिकही जखमी झाले असून त्यांची संख्या अधिक आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांच्या कमांडर्समध्ये फ्लॅग मीटिंगही झाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा गलवान खोऱ्यातील हिंसक चकमकीची आठवण करुन दिली आहे, ज्यात भारतीय लष्कराचे (Indian Army) 20 जवान जखमी झाले होते.

Galwan Valley
India China Conflict: अरुणाचलमध्ये भारत अन् चीनच्या सैनिकांमध्ये चकमक, अनेक भारतीय जवान जखमी

गलवानमध्ये काय घडलं?

15 जून 2020 रोजी पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली होती. ज्यामध्ये भारतीय लष्कराच्या कर्नलसह 20 जवान शहीद झाले होते. दोन्ही देशांमधील हा संघर्ष भारत-चीन सीमेवर गेल्या 4 दशकांतील सर्वात गंभीर संघर्ष असल्याचे वर्णन केले गेले. या संघर्षात भारताने आपल्या सैनिकांच्या मृत्यूची घोषणा केली होती, मात्र चीनने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. या चकमकीमध्ये चिनी सैन्याचेही मोठे नुकसान झाल्याचे भारताने म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com