Konkan Railway: कोकणवासीयांचा 'शिमगा' रेल्वे स्थानकावरच; 7 तास उशिरा धावणाऱ्या 'तेजस एक्सप्रेस'मुळे चाकरमान्यांचे हाल

Tejas Express 7 hours delay: कोकणात शिमगा (होळी) उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच, रेल्वेच्या विस्कळीत नियोजनाचा फटका प्रवाशांना बसला आहे.
Konkan Railway
Konkan RailwayDainik Gomantak
Published on
Updated on

कोकणात शिमगा (होळी) उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच, रेल्वेच्या विस्कळीत नियोजनाचा फटका प्रवाशांना बसला आहे. मुंबई सीएसएमटी (CSMT) येथून सुटणारी तेजस एक्सप्रेस सकाळी ५.५० वाजता सुटणार होती मात्र ही गाडी १२.५८ ला सुटली. सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची पहिली पसंती असलेल्या या प्रीमियम ट्रेनच्या विलंबामुळे हजारो प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

सकाळी ५.५० वाजता सुटणारी गाडी १२.५८ ला सुटली

तासांतासाला बदलणाऱ्या या वेळेमुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विशेषतः ठाणे, दादर आणि पनवेल स्थानकावर प्रवाशांची अलोट गर्दी पाहायला मिळत असून, लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

Konkan Railway
Goa News: मंत्र्यांच्या बंगल्यावरील मोर्चा भोवला; विरोधी पक्षनेते, आमदारांसह दीड हजारांहून अधिक आंदोलकांवर गुन्हा

स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी

कोकणात होळीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, त्यामुळे मुंबईतून लाखो चाकरमानी गावी रवाना होतात. तेजस एक्सप्रेस ही आरामदायी आणि वेगवान असल्याने तिला मोठी मागणी असते. मात्र, आज गाडी सुटण्यास इतका विलंब झाल्याने प्रवाशांच्या नियोजनाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे.

Konkan Railway
Goa Crime: रागाच्या भरात पत्नीच्या गळ्यावर केला वार, कर्नाटकातील विवाहितेचा मृत्यू; संशयित पतीला 7 दिवसांची कोठडी

गाडीला इतका उशीर का झाला, याबाबत रेल्वेकडून अद्याप कोणतेही अधिकृत तांत्रिक कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, ऐनवेळी अशा प्रकारचा विलंब झाल्याने कोकण रेल्वेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक प्रवासी पर्यायी वाहतुकीचा विचार करत आहेत, मात्र खासगी बसेसचे दर गगनाला भिडल्याने सामान्यांची कोंडी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com