donald trump and pm modi Dainik Gomantak
ग्लोबल

'POK' अन् 'अक्साई चीन' भारताचा भाग, ट्रेड डीलनंतर अमेरिकेने शेअर केला भारताचा नकाशा; चीन-पाकिस्तानचा जळफळाट

POK & Aksai Chin Indian Territory: अमेरिकेने एका ऐतिहासिक निर्णयाद्वारे पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांना मोठा धक्का दिला.

Manish Jadhav

POK & Aksai Chin Indian Territory: अमेरिकेने एका ऐतिहासिक निर्णयाद्वारे पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांना मोठा धक्का दिला असून भारताच्या बाजूने खंबीर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले. भारत आणि अमेरिका यांच्यात नुकत्याच झालेल्या महत्त्वपूर्ण व्यापार करारामुळे जागतिक राजकारणात भारताची ताकद वाढली. अशातच, अमेरिकेच्या एका अधिकृत नकाशाने आशिया खंडातील राजकारणात खळबळ उडवून दिली. अमेरिकन ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हच्या कार्यालयाने सोशल मीडियावर एक नकाशा जारी केला, ज्यामध्ये 'पाकव्याप्त काश्मीर' आणि 'अक्साई चीन' या दोन्ही विवादित भागांना भारताचा अविभाज्य हिस्सा म्हणून दाखवण्यात आले.

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार करारामुळे झाली. अमेरिकन ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हच्या अधिकृत 'X' हँडलवरुन या कराराची माहिती देण्यासाठी एक पोस्ट करण्यात आली होती. यामध्ये अमेरिकेतील सुका मेवा, कडधान्ये, लाल ज्वार आणि प्रक्रिया केलेल्या फळांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळणार असल्याचे सांगण्यात आले. या व्यापार वृद्धीची माहिती देणाऱ्या पोस्टमध्ये भारताचा जो नकाशा वापरण्यात आला, त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अमेरिकेने भारताचा जो पूर्ण नकाशा दाखवला, ज्यामध्ये जम्मू-काश्मीरसह पीओके आणि लडाखमधील अक्साई चीनचा भाग भारताच्या सीमेत स्पष्टपणे समाविष्ट केला.

पाकिस्तान (Pakistan) अनेक वर्षांपासून पीओकेवर आपला दावा सांगत आला आहे आणि या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो. दुसरीकडे, भारताची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली की, संपूर्ण काश्मीर हा भारताचाच भाग आहे. आता अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेने भारताच्या या भूमिकेला अधिकृतपणे नकाशाद्वारे पाठिंबा दिल्याने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा राजनैतिक पराभव पत्करावा लागला आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या 'दुखत्या नसेवर' हात ठेवल्याची चर्चा सध्या जगभरात रंगली आहे.

केवळ पाकिस्तानच नाही, तर चीनलाही अमेरिकेने या माध्यमातून कडक इशारा दिला आहे. अक्साई चिन या भागावर चीन आपला हक्क सांगत असतो आणि त्यावरुन भारत-चीन सीमावाद नेहमीच चर्चेत असतो. अमेरिकेने अक्साई चीनला भारताच्या नकाशात स्थान दिल्याने चीनच्या विस्तारवादी धोरणांना चपराक बसली आहे. अमेरिकेने जारी केलेला हा जुना किंवा मूळ नकाशा भारताच्या भौगोलिक अखंडतेवर शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे.

या व्यापार कराराने भारत (India) आणि अमेरिकेचे संबंध केवळ आर्थिक स्तरावरच नाही, तर भू-राजकीय स्तरावरही किती मजबूत झाले आहेत, हे जगाला दाखवून दिले आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे पाकिस्तान आणि चीनमधील संताप वाढण्याची शक्यता आहे, परंतु भारतासाठी ही मोठी मुत्सद्दी विजयाची बाब मानली जात आहे. अमेरिकेने नकाशाच्या माध्यमातून दिलेल्या या पाठिंब्यामुळे दक्षिण आशियातील सत्ता संतुलनामध्ये भारताचे पारडे जड झाले असून, ही बाब भारताच्या जागतिक ताकदीचा पुरावा मानली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT