America Attack Venezuela: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हवाई हल्ला ; संरक्षणमंत्र्यांचे घर अन् लष्करी तळाला केलं लक्ष्य Watch Video

America Attack Venezuela Video: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जागतिक राजकारणात एक अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे.
America Attack Venezuela
America Attack VenezuelaDainik Gomantak
Published on
Updated on

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जागतिक राजकारणात एक अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. अमेरिकेने दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएलावर थेट लष्करी आक्रमण केले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा अमेरिकन हवाई दलाच्या विमानांनी व्हेनेझुएलाची राजधानी काराकास आणि लष्करी तळांवर भीषण बॉम्बफेक केली. या हल्ल्यांनंतर संपूर्ण व्हेनेझुएलामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सरकारने तातडीने देशव्यापी आणीबाणी जाहीर केली आहे.

राजधानी काराकासमध्ये ७ मोठे स्फोट

मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी काराकासमध्ये किमान सात मोठे स्फोट ऐकू आले आहेत. विशेषतः शहराचा दक्षिण भाग, जो लष्करी तळांच्या जवळ आहे, तिथे मोठा विध्वंस झाला असून वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. 'रशिया टुडे'च्या वृत्तानुसार, अमेरिकन हवाई दलाने व्हेनेझुएलाच्या 'इस्ला मार्गरीटा' बेटावरील लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. आकाशात घिरट्या घालणारी युद्धविमाने आणि बॉम्बच्या आवाजामुळे नागरिक जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर धावताना दिसत आहेत. काही लोक सुरक्षिततेसाठी शहर सोडून बाहेर जात असल्याचे चित्र आहे.

हल्ल्यामागचे कारण

हे पाऊल उचलण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाला कडक इशारा दिला होता. व्हेनेझुएलाने अलिकडेच पाच अमेरिकन नागरिकांना अटक केली होती, त्यानंतर तणाव वाढला होता. ट्रम्प यांनी आधीच स्पष्ट केले होते की, अमेरिका लवकरच व्हेनेझुएलामध्ये जमिनीवरून हल्ला (Ground Operation) करू शकते.

अमेरिका प्रामुख्याने ड्रग्ज तस्करी करणाऱ्या तळांना लक्ष्य करत असल्याचे सांगत आहे. मात्र, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी हा आरोप फेटाळला असून, अमेरिका आपल्या देशातील तेल साठ्यावर कब्जा करण्यासाठी आणि सत्तापालट करण्यासाठी हे हल्ले करत असल्याचा दावा केला आहे.

व्हेनेझुएला सरकारचा तीव्र निषेध

या हल्ल्यानंतर व्हेनेझुएला सरकारने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून अमेरिकेच्या कृत्याचा निषेध केला आहे. निवेदनात म्हटले आहे की, "हा हल्ला संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरमधील कलम १ आणि २ चे सरळ उल्लंघन आहे.

अमेरिकेने नागरी वस्ती आणि लष्करी ठिकाणांवर बॉम्बफेक करून आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आणली आहे." लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन क्षेत्रातील स्थैर्य बिघडवण्याचे काम अमेरिकेने केल्याचा आरोप व्हेनेझुएलाने केला आहे. विशेष म्हणजे, ज्या दिवशी व्हेनेझुएलाने ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी अमेरिकेशी चर्चेची तयारी दर्शवली, त्याच दिवशी हा हल्ला झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com