Iran America Tension: "ट्रम्प इराणचे गुन्हेगार...!", खामेनेई यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षावर ठेवला विध्वंसाचा ठपका; जागतिक राजकारणात पुन्हा खळबळ

Ayatollah Ali Khamenei & Donald Trump: जगभरात सध्या युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असून विशेषतः अमेरिका आणि इराणमधील वाद आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे.
 Ayatollah Ali Khamenei & Donald Trump
Ayatollah Ali Khamenei & Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

Iran America Tension: जगभरात सध्या युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असून विशेषतः अमेरिका आणि इराणमधील वाद आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. इराणमधील हिंसाचार, आर्थिक नुकसान आणि देशाची बदनामी करण्यासाठी ट्रम्प हेच जबाबदार असून ते एक "गुन्हेगार" आहेत, असे खळबळजनक वक्तव्य खामेनेई यांनी केले.

खामेनेई यांचा ट्रम्प यांच्यावर 'गुन्हेगारी' शिक्का

शनिवारी (17 जानेवारी) एका धार्मिक कार्यक्रमात भाषण करताना आयतुल्लाह अली खामेनेई यांनी अमेरिकेच्या धोरणांवर सडकून टीका केली. खामेनेई म्हणाले, "आम्ही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना गुन्हेगार मानतो. त्यांनी इराणवर खोटे आरोप लावले, आमच्या मालमत्तेचे नुकसान केले आणि जागतिक स्तरावर इराणची (Iran) बदनामी केली." इराणमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसक निदर्शनांमागे अमेरिकेचा हात असल्याचा दावा त्यांनी केला. ट्रम्प यांनी निदर्शकांना प्रोत्साहन दिले आणि लष्करी मदतीची भाषा करुन इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केला, असा आरोपही त्यांनी लावला.

 Ayatollah Ali Khamenei & Donald Trump
America Iran Tension: "यावेळी गोळीचा निशाणा चुकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांना इराणची खुली धमकी; सरकारी टीव्हीवर हत्येच्या प्रयत्नाचे फोटो दाखवल्याने खळबळ

"इराणवर ताबा मिळवणे हेच अमेरिकेचे उद्दिष्ट"

खामेनेई यांनी आपल्या भाषणात अमेरिकेच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या मते, अमेरिकेचे मुख्य उद्दिष्ट हे 'इराणवर कब्जा करणे' हेच आहे. निदर्शने करणाऱ्या 'दंगेखोरांना' ट्रम्प यांनी 'इराणी नागरिक' म्हणून संबोधून इराणचा अपमान केला. खामेनेई पुढे म्हणाले, "इराणी जनतेने या दंगेखोरांची कंबर मोडली, आता आम्हाला त्यांना चिथावणी देणाऱ्यांचीही कंबर मोडावी लागेल." इराण स्वतःहून युद्ध पुकारणार नाही, परंतु देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

 Ayatollah Ali Khamenei & Donald Trump
Iran-America Tensions: ''आम्ही युद्ध सुरु करत नाही, पण...''; इराणने पुन्हा भरला अमेरिकेला दम

इराणमध्ये 3000 हून अधिक मृत्यूंचा दावा

इराणमधील परिस्थिती सध्या अत्यंत गंभीर आहे. मानवाधिकार संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या दाव्यानुसार, डिसेंबर 2025 च्या अखेरीस सुरु झालेल्या निदर्शनांमध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईत आतापर्यंत 3000 ते 12000 लोकांचा मृत्यू झाला. मात्र, इराण सरकारने अधिकृतपणे कोणतीही आकडेवारी जाहीर केलेली नाही. देशात सध्या इंटरनेटवर बंदी असून सुरक्षा दलांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

 Ayatollah Ali Khamenei & Donald Trump
Israel Iran Tensions: ''इस्रायल पहिल्यांदाच स्वतःचं संरक्षण करण्यात अपयशी ठरला''; नेतन्याहू यांना माजी पंतप्रधानांनी घेतलं फैलावर

ट्रम्प यांची भूमिका आणि इराणचा नकार

यापूर्वी, डोनाल्ड ट्रम्प यांनी निदर्शकांचे खुलेआम समर्थन करत "शांततापूर्ण निदर्शकांची हत्या झाल्यास अमेरिका हस्तक्षेप करेल," असे म्हटले होते. तसेच, इराणने 800 हून अधिक लोकांची फाशी रद्द केल्याबद्दल ट्रम्प यांनी आभार मानले होते. मात्र, इराणने हा दावा फेटाळून लावत असे काहीही घडले नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संवाद पूर्णपणे तुटला असून युद्धाचा धोका पुन्हा एकदा निर्माण झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com