EPFO 4 Big Changes: आता पीएफ काढणे होणार सोपे! यूपीआय सुविधा, शिथिल नियम आणि निवृत्तीचे हप्ते; जाणून घ्या 4 मोठे बदल

EPFO 3.0 February 2027 Centralized System: तुम्ही जर नोकरी करणारे असाल आणि दरमहा तुमच्या पगारातून प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीएफ कपात होत असेल, तर येणारा काळ तुमच्यासाठी मोठा दिलासा देणारा ठरु शकतो.
EPFO 3.0 February 2027 Centralized System
EPFO 4 Big ChangesDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

EPFO 3.0 February 2027 Centralized System: तुम्ही जर नोकरी करणारे असाल आणि दरमहा तुमच्या पगारातून प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीएफ कपात होत असेल, तर येणारा काळ तुमच्यासाठी मोठा दिलासा देणारा ठरु शकतो. कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात ईपीएफओ आपल्या सेवा अधिक जलद, सोप्या आणि आधुनिक करण्यासाठी मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीत पीएफ काढण्याचे नियम शिथिल करण्याचे महत्त्वाचे निर्णय मंजूर करण्यात आले.

यामध्ये खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची अट 25 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांपर्यंत कमी करणे आणि अंतिम रक्कम काढण्यासाठी लागणारा 12 महिन्यांचा कालावधी 2 महिन्यांवर आणणे यांसारख्या निर्णयांचा समावेश आहे.

EPFO 3.0 February 2027 Centralized System
EPFO SWP Facility: PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! निवृत्तीवर SWP सुविधा, बेरोजगारीवर 2 महिन्यांचा नियम आणि 10 टक्के बॅलेन्स मर्यादा; ईपीएफओचे नवे नियम लागू

याशिवाय, ईपीएफओ आपली तांत्रिक यंत्रणा पूर्णपणे अद्ययावत करुन 'ईपीएफओ 3.0' आणण्याच्या तयारीत असून, ही प्रणाली फेब्रुवारी 2027 मध्ये सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे दाव्यांची पूर्तता वेगाने होईल आणि बहुतांश कामकाज कागदविरहित होईल. बँकेप्रमाणे केंद्रीकृत व्यवस्था आल्याने नोकरी किंवा शहर बदलल्यास जुन्या प्रादेशिक कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची तांत्रिक कटकट मोठ्या प्रमाणात कमी होईल. पुढील 50 वर्षांत सुमारे 200 कोटी कर्मचाऱ्यांची माहिती हाताळण्याच्या क्षमतेने ही यंत्रणा उभारली जात आहे.

EPFO 3.0 February 2027 Centralized System
WhatsApp PF Balance Check 2026: पीएफ खातेधारकांसाठी खूशखबर! आता व्हॉट्सॲपवर घरबसल्या तपासा तुमचा पीएफ बॅलन्स; EPFOची भन्नाट सुविधा

सध्या पीएफमधून रक्कम काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज आणि प्रतीक्षेची प्रक्रिया पार पाडावी लागते. मात्र, आता यूपीआयच्या (UPI) माध्यमातून पीएफ काढण्याची सुविधा सुरु करण्याची तयारी सुरु आहे. भीम ॲपसारख्या माध्यमातून डिसेंबर 2026 च्या अखेरीस ही सेवा सुरु होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याद्वारे खातेदारांना एकूण शिल्लक, काढता येणारी रक्कम आणि खात्यात सुरक्षित ठेवायचा किमान निधी सहज पाहता येईल. दुसरीकडे, एटीएममधून पीएफ काढण्याच्या सुविधेबाबत अद्याप कोणतीही ठोस तारीख किंवा अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही, त्यामुळे सध्या हा केवळ संभाव्य बदल मानला जात आहे.

EPFO 3.0 February 2027 Centralized System
EPFO Pension Rule: पगारातून PF कापला जातोय? रिटायरमेंटनंतर किती पेन्शन मिळेल? 'या' सोप्या फॉर्म्युल्याने करा अचूक कॅल्क्युलेशन

निवृत्तीच्या वेळी अनेक जण संपूर्ण रक्कम एकदम काढून घेतात. नवीन प्रस्तावानुसार, निवृत्त कर्मचाऱ्यांना आपला निधी दरमहा, 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी हप्त्यांमध्ये काढता येईल. खात्यात शिल्लक राहणाऱ्या रकमेवर व्याज सुरुच राहील. तसेच काही रक्कम एकरकमी घेऊन उर्वरित रक्कम हप्त्यांमध्ये घेणे किंवा केवळ व्याजाइतकी रक्कम काढणे असे पर्यायही उपलब्ध होऊ शकतात.

EPFO 3.0 February 2027 Centralized System
PF Withdrawal: EPFO चा ऐतिहासिक निर्णय: आता PF चे पैसे थेट ATM आणि UPI द्वारे काढता येणार!

सुरुवातीच्या टप्प्यात 55 वर्षांपेक्षा जास्त वय आणि 5 लाख रुपयांहून अधिक पीएफ शिल्लक असलेल्या सुमारे 6.32 लाख सदस्यांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, गिग वर्कर्स आणि डिलिव्हरी पार्टनर्सनाही युनिव्हर्सल अकाउंट नंबरशी जोडलेल्या माध्यमातून थर्ड पार्टीद्वारे छोटे योगदान मिळण्याची तरतूद करण्याचा विचार आहे. मात्र, या योजना प्रत्यक्षात येण्यासाठी नियम आणि कायद्यांमध्ये आवश्यक दुरुस्त्या होणे बाकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.