America Winter Storm: अमेरिकेत 'बर्फाचा प्रलय'! 8000 उड्डाणे रद्द, 14 कोटी लोकांवर मृत्यूचे सावट; ट्रम्प यांनी पुकारली आणीबाणी VIDEO

8000 Flights Cancelled: अमेरिका सध्या एका महाविनाशकारी नैसर्गिक संकटाचा सामना करत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीलाच अमेरिकेतील विमान वाहतूक यंत्रणा पूर्णपणे कोलमडली.
America Winter Storm
America Winter StormDainik Gomantak
Published on
Updated on

8000 Flights Cancelled: अमेरिका सध्या एका महाविनाशकारी नैसर्गिक संकटाचा सामना करत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीलाच अमेरिकेतील विमान वाहतूक यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून तब्बल 8000 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अमेरिकेच्या इतिहासातील हे सर्वात भीषण 'शीतयुद्ध' मानले जात असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला संबोधित करताना तातडीने आणीबाणीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. या संकटामुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला असून कोट्यवधी अमेरिकन नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.

भीषण 'हिमयुग' आणि उणे 40 अंश तापमान

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील 40 हून अधिक राज्यांना भीषण थंडीचा सामना करावा लागणार आहे. अनेक ठिकाणी तापमान उणे 40 डिग्री सेल्सिअसच्या खाली गेले आहे. या तापमानात केवळ 10 मिनिटे उघड्यावर राहिल्यास 'फ्रॉस्टबाइट' होण्याचा धोका आहे. न्यू मेक्सिकोपासून न्यू इंग्लंडपर्यंत सुमारे 14 कोटी लोकांसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.

America Winter Storm
Iran America Tension: "ट्रम्प इराणचे गुन्हेगार...!", खामेनेई यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षावर ठेवला विध्वंसाचा ठपका; जागतिक राजकारणात पुन्हा खळबळ

विमान वाहतूक ठप्प

फ्लाईट ट्रॅकिंग वेबसाइट 'FlightAware' नुसार, शनिवारी 3400 आणि रविवारी 5000 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. टेक्सास, ओक्लाहोमा, ओमाहा यांसारख्या राज्यांमध्ये विमानतळांवर प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डझनभर राज्यांच्या गव्हर्नरांनी आपत्कालीन स्थिती घोषित केली आहे. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग एबॉट यांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. रस्त्यांवर बर्फाचे थर साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

विद्युत पुरवठा खंडित होण्याचा धोका

भीषण बर्फवृष्टी आणि वेगवान वाऱ्यांमुळे वीज वाहक तारांवर बर्फ साचून त्या तुटण्याची भीती आहे. अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवस वीज पुरवठा खंडित राहू शकतो, असा इशारा उपयोगिता कंपन्यांनी दिला आहे. बिस्मार्क आणि नॉर्थ डकोटा सारख्या शहरांमध्ये थंडी इतकी प्रचंड आहे की जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

America Winter Storm
India America Trade War: "मोदींशी लवकरात लवकर बोला'', ट्रम्प यांना खासदारांचं पत्र, भारत-अमेरिका 'ट्रेड वॉर'मध्ये आता डाळींचा पेच, कोण घेणार पुढाकार?

शाळा, चर्च आणि कार्निव्हल रद्द

या संकटामुळे फिलाडेल्फियामधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण भागातील अनेक विद्यापीठांनी सोमवारचे वर्ग रद्द केले आहेत. लुईझियानातील प्रसिद्ध कार्निव्हल परेड स्थगित करण्यात आली असून, चर्चमधील रविवारच्या प्रार्थना ऑनलाईन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नैशविले येथील प्रसिद्ध 'ग्रँड ओले ओप्री' रेडिओ प्रदर्शन देखील प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

America Winter Storm
America Attack Venezuela: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हवाई हल्ला ; संरक्षणमंत्र्यांचे घर अन् लष्करी तळाला केलं लक्ष्य Watch Video

ट्रम्प सरकार हाय-अलर्टवर

अमेरिकेची (America) मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा 'फेमा' (FEMA) पूर्ण क्षमतेने कामाला लागली आहे. सरकारने 30 शोध आणि बचाव पथकांना 'स्टँडबाय'वर ठेवले आहे. बाधित क्षेत्रातील लोकांसाठी 70 लाख जेवणांची पाकिटे, 6 लाख ब्लँकेट्स आणि 300 जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रपती ट्रम्प यांनी सोशल मीडियावरुन स्पष्ट केले की, फेडरल सरकार स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे.

America Winter Storm
America-Russia Tension: 'रशियासोबत अणुयुद्धासाठी अमेरिका तयार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ; जागतिक राजकारण तापलं VIDEO

संकट अजून संपलेले नाही

हवामान तज्ज्ञांच्या मते, हे बर्फाचे वादळ दक्षिण भागातून उत्तर-पूर्वेकडे सरकत असून वॉशिंग्टन, न्यूयॉर्क आणि बोस्टनमध्ये सुमारे एक फूट बर्फ साचण्याची शक्यता आहे. वादळ गेल्यानंतरही साचलेला बर्फ वितळण्यासाठी बराच वेळ लागणार असल्याने वीज कंपन्या आणि रस्ते विकास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com