Funny Indian Games Trending Video Dainik Gomantak
देश

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

Funny Indian Games Trending Video: सोशल मीडियावर एका अत्यंत वेगळ्या आणि मजेशीर खेळाचा व्हिडिओ समोर आला असून तो नेटकऱ्यांचे प्रचंड मनोरंजन करत आहे.

Manish Jadhav

Viral Slipper Game Social Media: लहानपणी आपण सर्वांनीच अनेक पारंपारिक आणि मजेशीर खेळ खेळले असतील. मोठे झाल्यावर आणि कामाच्या व्यापात व्यस्त झाल्यावर जेव्हा आपण लहान मुलांना ते खेळ खेळताना पाहतो, तेव्हा आपल्याला आपल्या बालपणाची आठवण येते. मात्र, आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात काही लोक अशा काही अतरंगी आणि अजब खेळांचा शोध लावत आहेत, जे पाहून हसावे की घाबरावे हेच समजत नाही.

काही दिवसांपूर्वी डोळ्यांवर पट्टी बांधून हवेत बेल्ट फिरवण्याचा एक धोकादायक खेळ व्हायरल झाला होता. हा खेळ जुना होतो न होतो, तोच आता सोशल मीडियावर (Social Media) एका अत्यंत वेगळ्या आणि मजेशीर खेळाचा व्हिडिओ समोर आला असून तो नेटकऱ्यांचे प्रचंड मनोरंजन करत आहे.

व्हायरल होत असलेल्या या नव्या खेळाचे कोणतेही अधिकृत नाव अद्याप समोर आलेले नाही, परंतु हा संपूर्ण खेळ केवळ नशिबावर आणि अंदाजावर आधारित आहे. जर तुमचा अंदाज बरोबर निघाला तर तुम्ही वाचाल, नाहीतर पाठीवर चपलेचा जोरदार फटका बसेल. या खेळाचे नियम अतिशय साधे पण मजेशीर आहेत. एका टेबलवर 3-4 वेगवेगळ्या चपलांची एक-एक जोडी ठेवली जाते. या टेबलच्या पुढे एक व्यक्ती डोळे बंद करुन किंवा समोर तोंड करुन बसते, तर त्याच्या अगदी मागे दुसरी व्यक्ती त्याच चपलांच्या उरलेल्या जोड्या घेऊन उभी राहते.

मागे उभी असलेली व्यक्ती हळूच कोणतीही एक चप्पल हवेत उचलते. त्याच वेळी टेबलपाशी बसलेल्या व्यक्तीलाही समोरुन कोणतीही एक चप्पल उचलण्यास सांगितले जाते. जर दोघांनी उचललेली चप्पल हुबेहूब एकच निघाली, तर ती व्यक्ती बचावते. पण जर हा अंदाज चुकला, तर मागे उभ्या असलेल्या व्यक्तीच्या हातात जी चप्पल आहे, त्याच चपलेने समोर बसलेल्याच्या पाठीवर सणसणीत दणका दिला जातो.

हा अजब आणि हास्यास्पद खेळ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर 'kashish__r19' नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या इतका पसंतीस उतरला की, वृत्त लिहिण्यापर्यंत तब्बल 5 लाखांपेक्षा जास्त लोकांनी याला लाईक केले. व्हिडिओ पाहिल्यानंतर युझर्सनी कमेंट बॉक्समध्ये हसून दाद दिली.

एका युझरने लिहिले की, "हा खेळ पाहून खूप मजा आली," तर दुसऱ्याने "मला या खेळाचा बिहाइंड द सीन व्हिडिओ पाहायचा आहे" अशी इच्छा व्यक्त केली. एका प्रेक्षकाने तर व्हिडिओच्या उत्कृष्ट एडिटिंगचे कौतुक करत "एडिटरला 100 तोफांची सलामी दिली पाहिजे" अशी मजेशीर कमेंट केली. बहुतांश युझर्सनी कमेंट्समध्ये हसण्याचे इमोजी पोस्ट करुन या खेळाचा आनंद घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

ED Raid: 155 कोटींचा बँक घोटाळा अन् 'ईडी'चा थेट गोव्यात छापा! 'या' बड्या कंपनीवरील कारवाईने देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT