

पणजी: शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असले, तरी सद्य:स्थितीत सुरू असलेल्या सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित १४७३ पैकी केवळ ४२ शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी सुरू असल्याचे केंद्र सरकारच्या युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस (युडीआयएसई प्लस) अहवालातून समोर आले आहे.
राज्यात सध्या १४७३ शाळा सुरू आहेत. त्यात ७७१ सरकारी, ५५९ अनुदानित आणि १४३ विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे. त्यातील केवळ ४२ शाळांमध्येच डिजिटल लायब्ररी सुरू असून, त्यात १३ सरकारी (१.७ टक्के), २० अनुदानित (३.६ टक्के) आणि ९ विनाअनुदानित (६.३ टक्के) शाळांचा समावेश आहे.
एकूण शाळांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ २.९ टक्के इतकेच असल्याचे अहवालातील आकडेवारीतून दिसून येते. दुसरीकडे, १,४७३ पैकी ४९३ शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम असून, त्यात सरकारी शाळांपेक्षा अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये स्मार्ट क्लासरुम अधिक आहेत. सद्य:स्थितीत ११३ सरकारी शाळा (१४.७ टक्के), ३०३ अनुदानित शाळा (५४.२ टक्के) आणि ७७ विनाअनुदानित शाळांमध्ये (५३.८ टक्के) स्मार्ट क्लासरुम असल्याचेही अहवाल सांगतो.
मोबाईल वापरात सरकारी शाळा अव्वल
शिक्षणासाठी मोबाईलचा वापर करण्यात मात्र सरकारी शाळा अव्वल ठरल्या आहेत. १४७३ पैकी एकूण ६३२ शाळांमध्ये शिक्षणासाठी मोबाईलचा वापर होतो. त्यातील ७७१ पैकी ४२२ (५४.७ टक्के), ५५९ पैकी १५७ अनुदानित (२८.१) आणि १४३ पैकी ५३ (३३.१) शाळांमध्ये शिक्षणासाठी मोबाईलचा वापर होत असल्याचे अहवालातून समोर आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.