Viral Video: रेल्वे ट्रॅकवर मृत्यूशी खेळ! मद्यधुंद व्यक्तीच्या 'या' कृत्यामुळे प्रवाशांचा उडाला थरकाप; नेटकरी म्हणाले, ''मी असतो तर खाली उतरुन बदडला असता''

Drunk Man on Railway Track Mumbai: सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेनशी संबंधित असाच एक अतिशय थक्क करणारा आणि तितकाच धोकादायक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
Mumbai Local Train Viral Video
Drunk Man on Railway Track MumbaiDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai Local Train Viral Video: आजच्या काळात लोक आपला कंटाळा घालवण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मेट्रो, ट्रेन किंवा बसने प्रवास करताना लोक मोबाईलवर सोशल मीडिया स्क्रोल करताना सर्रास दिसतात. रोजच्या या डिजिटल जगात काहीतरी असे व्हायरल होते, ज्याची कोणी कल्पनाही केलेली नसते. सध्या सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेनशी संबंधित असाच एक अतिशय थक्क करणारा आणि तितकाच धोकादायक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मुंबईच्या (Mumbai) लोकल ट्रेनमधील एका प्रवाशाने रेकॉर्ड केला. व्हिडिओमध्ये दिसते की, एक लोकल ट्रेन सतत हॉर्न वाजवत अतिशय धिम्या गतीने पुढे सरकत आहे. ट्रेनचा वेग इतका कमी असण्यामागचे कारण म्हणजे एक व्यक्ती त्याच रेल्वे ट्रॅकवर ट्रेनच्या अगदी पुढे आरामात चालत आहे. तो माणूस प्रचंड दारुच्या नशेत होता आणि त्याची नशा इतकी टोकाची होती की त्याला मागून येणाऱ्या लोकल ट्रेनच्या हॉर्नचा आवाजही ऐकू येत नव्हता.

Mumbai Local Train Viral Video
Viral Video: जुगाड की जीवाशी खेळ? स्कूटीवर बर्फाची वाहतूक करणाऱ्या पठ्ठ्याचा थरार व्हायरल; स्टंटबाजी पाहून नेटकरी संतापले

तो कोणत्याही भीतीशिवाय रेल्वे ट्रॅकवरुन पुढे पुढे जात होता. त्याच्या या कृत्यामुळे लोको पायलटने ट्रेनचा वेग कमी केला आणि तो सतत हॉर्न वाजवून त्या व्यक्तीला ट्रॅकवरुन हटवण्याचा प्रयत्न करत होता, जेणेकरुन ट्रेन पुढे नेणे शक्य होईल. मात्र, तो व्यक्ती तिथून स्वतःहून हटला की लोको पायलटला खाली उतरुन त्याला बाजूला करावे लागले, हे व्हिडिओमध्ये स्पष्ट झालेले नाही.

Mumbai Local Train Viral Video
Viral Post: "पेड लीव्ह आमचा हक्क, उपकार नाही!" कॉर्पोरेट कंपन्यांच्या 'टॉक्सिक' कल्चरवर भडकली तरुणी Watch Video

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर 'mr.dipesh_13' नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला. इंटरनेटवर या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 66 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले असून कमेंट्सचा पूर आला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या आणि मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. एका युझरने विचारले की, "शेवटी नक्की काय झाले?", तर दुसऱ्याने लिहिले, "ही देशी दारुची ताकद आहे." आणखी एका युझरने "हा खूप धोकादायक माणूस आहे भाई" अशी कमेंट केली, तर एकाने संताप व्यक्त करत "मी असतो तर खाली उतरुन त्याला बदडून काढले असते" असे म्हटले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com