मेट्रो स्टेशनवर वृद्धाचा विकृतपणा! महिलेसमोरच केलं घाणेरडं कृत्य; म्हणाला, "तुला जे करायचं ते कर" Video Viral होताच पोलीस ॲक्शन मोडमध्ये

Delhi Metro Kalkaji station viral video: सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर किंवा अयोग्य जागी लघुशंका करणे अत्यंत आक्षेपार्ह मानले जाते.
Delhi Metro Kalkaji station viral video
Delhi Metro Kalkaji station viral videoDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर किंवा अयोग्य जागी लघुशंका करणे अत्यंत आक्षेपार्ह मानले जाते. दिल्ली मेट्रोमधून (Delhi Metro) यापूर्वीही असे अनेक प्रकार समोर आले आहेत, ज्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेवर आणि शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अशीच एक धक्कादायक आणि संतापजनक घटना कालकाजी मेट्रो स्टेशनवरील लिफ्टमध्ये घडली आहे. एका वृद्ध व्यक्तीने लिफ्टमध्ये दोन मुली आणि एका मुलासमोर लघवी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, पीडित महिलेने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

व्हिडिओमध्ये वृद्धाचा उद्धटपणा

दीपशिखा मेहता (@curly_myth) नावाच्या महिला प्रवाशाने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती सांगते, "मी कालकाजी मेट्रो स्टेशनवर होते. हे आजोबा माझ्यासोबतच लिफ्टमध्ये चढले आणि त्यांनी लिफ्टच्या आत दोन मुली आणि एका मुलासमोर लघवी केली." जेव्हा दीपशिखा यांनी त्या व्यक्तीला कॅमेऱ्यासमोर विचारले की, "अंकल, तुम्ही असं का केलं?" त्यावर त्या वृद्धाने अत्यंत उद्धटपणे उत्तर दिले, "अरे यार, तुला जे करायचं आहे ते तू कर"

Delhi Metro Kalkaji station viral video
Goa Tourism: गोवा हाऊसफुल्ल! 2025 मध्ये 1 कोटी पर्यटकांची ऐतिहासिक नोंद, पण परदेशी पर्यटकांची पाठ; काय आहेत कारणे?

नेटिझन्स संतापले

दीपशिखा यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, "विचार करा, तुम्ही मेट्रोच्या लिफ्टमध्ये जाता आणि तिथे एक माणूस दोन मुलींसमोर बिनधास्तपणे लघवी करत आहे. हे अत्यंत घृणास्पद, लाजीरवाणं आणि अस्वीकार्य आहे. सार्वजनिक जागा म्हणजे शौचालय नव्हे." या व्हिडिओला सोशल मीडियावर ११ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि ३४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर हजारो लोकांनी कमेंट्स करून या कृत्याचा निषेध केला आहे.

दिल्ली पोलीस आणि DMRC ची कारवाई

या प्रकरणाची गंभीर दखल घेत दिल्ली पोलिसांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून माहिती देण्यात आली की, डीसीपी (DCP) मेट्रोने या घटनेची सखोल चौकशी केली आहे. रिपोर्टनुसार, ही घटना १५ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास घडली. हा वृद्ध प्रवासी जामिया मेट्रो स्टेशनवरून फरीदाबादकडे जात होता.

Delhi Metro Kalkaji station viral video
Goa Beach: गर्दीपासून दूर आणि बागा-कळंगुटच्या अगदी जवळ; गोव्यात फिरायला जाताना 'हा' सुंदर बीच कधीही चुकवू नका!

कालकाजी स्टेशनवर मेट्रो बदलत असताना अचानक त्यांना तीव्र 'मेडिकल इमर्जन्सी' (वैद्यकीय अडचण) जाणवली. त्यांनी जवळपास शौचालय शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने त्यांनी लिफ्टमध्येच एका बाटलीत लघुशंका केली. असे असले तरी, सार्वजनिक ठिकाणी उपद्रव आणि अस्वच्छता पसरवल्याबद्दल दिल्ली मेट्रो प्रशासनाने (DMRC) त्या व्यक्तीवर डीMRC ॲक्टच्या कलम ५९ अंतर्गत कायदेशीर दंडात्मक कारवाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com