

पणजी: ‘आप’चे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून कोणत्याही अटींशिवाय प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाला १० लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण देण्याच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी वेळ मागितला आहे. पत्रकार परिषदेत नाईक यांनीच ही माहिती दिली.
ते म्हणाले की, ‘आप’ची ही मागणी राजकारणासाठी नसून प्रत्येक गोमंतकीयाला दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी आहे. गोवा सरकारने आरोग्य व्यवस्था सुधारण्याची खरी इच्छा दाखवली, तर पंजाबमध्ये आप सरकारने यशस्वीपणे राबविलेल्या १० लाख रुपयांच्या आरोग्य विमा योजनेचा अनुभव आम्ही राजकारण बाजूला ठेवून सरकारसोबत शेअर करण्यास तयार आहोत.
पंजाबच्या आरोग्य मॉडेलची तुलना करताना वाल्मिकी नाईक म्हणाले की, गोव्यातील डीडीएसएसवाय योजनेत केवळ ४४७ उपचारांचा समावेश आहे, तर पंजाबमध्ये २,३५० उपचारांना विमा संरक्षण दिले जाते. पंजाबमधील आप सरकार कोणत्याही अटींशिवाय प्रत्येक कुटुंबाला १० लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण देते, ज्यामुळे श्रीमंत, गरीब आणि मध्यमवर्गीय सर्वांनाच समान दर्जाची आरोग्यसेवा मिळते. असा दावा त्यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.