Viral Video: जुगाड की जीवाशी खेळ? स्कूटीवर बर्फाची वाहतूक करणाऱ्या पठ्ठ्याचा थरार व्हायरल; स्टंटबाजी पाहून नेटकरी संतापले

Man Carries Ice On Scooter Seat: रस्त्यावरुन ये-जा करताना अनेकदा आपल्याला अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, ज्या आपले लक्ष पूर्णपणे वेधून घेतात.
Man Carries Ice On Scooter Seat
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Viral Video Scooter Ice Blocks: रस्त्यावरुन ये-जा करताना अनेकदा आपल्याला अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, ज्या आपले लक्ष पूर्णपणे वेधून घेतात. सामान्यतः लोक अशा गोष्टी पाहून पुढे निघून जातात, परंतु काही उत्साही लोक ते मोबाईलमध्ये कैद करुन सोशल मीडियावर शेअर करतात. जर तो व्हिडिओ खरोखरच अतरंगी असेल, तर तो इंटरनेटवर वाऱ्यासारखा व्हायरल होतो. सध्या असाच एक डोळे चक्रावून टाकणारा आणि थक्क करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालत आहे, जो पाहून तुम्हाला हसूही येईल आणि आश्चर्यही वाटेल.

स्कूटीवर क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या वस्तू अगदी जुगाडू पद्धतीने घेऊन जाताना आपण अनेकदा पाहतो, मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जे दिसले, ते अतिशय अकल्पनीय आहे. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने आपल्या स्कूटीवर बर्फाची वाहतूक करण्यासाठी थेट जुगाडाची मर्यादाच पार केली. त्याने स्कूटीच्या पाया ठेवण्याच्या जागेवर तर बर्फ ठेवलाच, पण त्याहूनही अजब म्हणजे त्याने स्कूटीच्या संपूर्ण सीटवरही बर्फाच्या मोठ्या लाद्या ठेवल्या. यामुळे स्कूटीवर त्याच्या स्वतःला बसण्यासाठी अजिबात जागा उरली नाही. अशा परिस्थितीत, या पठ्ठ्याने अगदी मागच्या टोकावर, म्हणजेच स्कूटीच्या कॅरिअरजवळ कसेबसे बसून अतिशय धोकादायक पद्धतीने गाडी चालवण्याचा मार्ग निवडला.

Man Carries Ice On Scooter Seat
Viral Video: अजब थरार! स्कूटीच्या धडकेत हत्तीचा दातच तुटला, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले, ''आता हत्तीही सुरक्षित नाहीत''

विशेष म्हणजे, हा पठ्ठ्या स्कूटी अत्यंत सावधगिरीने किंवा हळूहळू चालवत नसून, तो भरधाव वेगात रस्त्यावरुन नागमोडी पद्धतीने गाडी पळवत आहे. सीटवर बर्फ असल्याने त्याला हँडलवर पूर्ण नियंत्रण ठेवणेही कठीण जात असल्याचे दिसत आहे. त्याच्या या धाडसी आणि तितक्याच मूर्खपणाच्या स्टंटमुळेच हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर 'raghavrrrathod' नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून, कमी कालावधीतच या व्हिडिओला 55 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे.

Man Carries Ice On Scooter Seat
Viral Video: थोडंही संतुलन बिघडलं तर खेळ खल्लास! मृत्यूला मुठीत घेऊन काकाची लखनौच्या रस्त्यावर खतरनाक स्टंटबाजी; भन्नाट स्वॅग व्हायरल

त्याचवेळी, हा अतरंगी व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला असून अत्यंत मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने लिहिले की, "क्या बात है, हा तर अत्यंत अतरंगी ड्रायव्हर निघाला!" तर दुसऱ्या एका युझरने त्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विचारले, "पण हा गाडी कशी थांबवणार आणि कोणत्या पायाने?" तिसऱ्या एका युझरने त्याच्या वेगाची फिरकी घेत लिहिले, "हा तर बर्फ वितळण्याच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने गाडी चालवत आहे." तर आणखी एका युझरने त्याला कडक शब्दांत सुनावत लिहिले की, "अशा स्टंटमुळे एखाद्या दिवशी हा याच बर्फावर कायमचा झोपलेला दिसेल." हा व्हिडिओ सध्या मनोरंजनाचा विषय ठरला असला, तरी अशा प्रकारे चालवलेली गाडी जीवघेणी ठरु शकते यात शंका नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com