

पणजी: राज्यातील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नो डेव्हलपमेंट झोन (एनडीझेड) महत्त्वाचे आहे. तरीही आम आदमी पक्षाचे (आप) बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगश ‘एनडीझेड’ला विरोध करीत आहेत. दिल्लीतील लॉबीने गोव्यात खरेदी केलेल्या जमिनी वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे का? असा प्रश्न माजी मंत्री मिकी पाशेको यांनी बुधवारी उपस्थित केला.
पणजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘‘एनडीझेडमधील जमिनींमध्ये बांधकामे, प्रकल्प उभे करता येत नाहीत. त्यामुळे डोंगर, शेती, समुद्रकिनाऱ्यांच्या परिसरातील जमिनींचे आणि पर्यावरणाचेही संरक्षण होणार आहे. तरीही आमदार व्हिएगश ‘एनडीझेड’ला विरोध करत आहेत.
विरोध करून त्यांना त्यांच्या दिल्ली लॉबीच्या जमिनी वाचवायच्या आहेत का? याचे उत्तर त्यांनी देणे आवश्यक आहे,’’ असे पाशेको म्हणाले. दुसरीकडे, धिरयो हा राज्यातील पारंपरिक खेळ आहे. त्यामुळे राज्यात धिरयोला कायदेशीर मान्यता मिळणे आवश्यक आहे, असे मत मिकींनी व्यक्त केले.
काँग्रेसने दिली तरी उमेदवारी घेणार नाही!
आगामी विधानसभा निवडणूक युती करून लढवण्याचा प्रस्ताव आम्ही काँग्रेसला दिला होता. परंतु, काँग्रेसने तो स्वीकारला नाही. त्यामुळे आम्ही तिसरी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर आपला अजिबात विश्वास नाही. त्यामुळे काँग्रेसने उमेदवारी दिली, तरी मी ती घेणार नाही, असेही पाशेको म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.