महाराष्ट्र

Vedanta Foxconn: वेदांता-फॉक्सकॉन वरून महाराष्ट्रात वादळ, आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. यावरून आता राजकारण देखील सुरू झाले असून, आरोप-प्रत्यारोपांना ऊत आले आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्रीविधान सभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar) यांनी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारा आहे. असे म्हटले असून, वेदांत- फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्प महाराष्ट्रात परत आणण्याची मागणी केली आहे.

माजी पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी वेदांता-फॉक्सकॉन शिंदे-फडणवीस सरकारवर टिका केली आहे. तसेच, रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.

महाविकास आघाडी सरकारमधील उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आताचे सरकार हे नबळट सरकार असल्याचा आरोप केला आहे. हा प्रकल्प गुजरातला गेला तरी हे सरकार चकार शब्द काढमार नाही याची खात्री इतर राज्यांना आणि भारत सरकारला असल्याचे देसाई म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्र सरकारविरोधात काही बोलणार नाहीत. ते अन्यायाविरोधात आवाज उठवणार नाहीत असेही देसाई यावेळी म्हणाले. गुजरातने नेहमीच महाराष्ट्राच्या वाट्याचं हिरावून नेलं आहे. असे म्हणत सुभाष देसाईंनी गुजरातच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला.

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रयत्न करावेत. शिवसेना सरकारला वाटेल ते सहकार्य करेल असेही देसाई यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर टिका केली आहे. महविकास आघाडी सरकारने कधीच वेदांता-फॉक्सकॉन कंपनीला पॅकेज दिले नाही. मविआ सरकारच्या काळात हाय पॉवर कमिटीची बैठकदेखील झाली नाही. ही बैठक झाली असती तर वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प राज्याबाहेर गेलाच नसता असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

Lok Sabha Election 2024: ‘’चिदंबरम यांनी भ्रष्टाचार वाढवला, आरबीआयकडून सांगण्यात यायचे...’’; राजीव चंद्रशेखर यांचा हल्लाबोल

Cashew Farmer : निवडणुकीच्या धामधुमीत काजू उत्‍पादक वाऱ्यावर; उत्पादन कमी १६ हजार जणांना फटक

SCROLL FOR NEXT