Israeli Air Force Strike
Israel Missile Attack On IranDainik Gomantak

Israel Attack On Iran: क्षेपणास्त्रांचा मारा अन् सायरनचा आवाज...! इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला; बॅलिस्टिक मिसाइल्सनी हादरलं 'तेहरान' VIDEO

Israeli Air Force Strike: मध्यपूर्वेत आधीच धुमसत असलेल्या संघर्षाने आता अत्यंत भयानक वळण घेतले. इस्रायलने इराणवर मोठा लष्करी हल्ला केला.
Published on

Israel Missile Attack On Iran: मध्यपूर्वेत आधीच धुमसत असलेल्या संघर्षाने आता अत्यंत भयानक वळण घेतले. इस्रायलने इराणवर मोठा लष्करी हल्ला केला असून, संपूर्ण इराणमध्ये हवाई हल्ल्यांचे सायरन वाजत आहेत. इस्रायली हवाई दलाने या हल्ल्याची पुष्टी केली असून, इराणची राजधानी तेहरानसह अनेक संवेदनशील भागांमध्ये एकामागून एक प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण जगात खळबळ माजली असून परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने (Israel) इराणवर एकाच वेळी अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. तेहरानमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष करण्यात आले असून हल्ल्यानंतर शहराच्या विविध भागांतून आगीच्या ज्वाळा आणि आकाशात झेपावणारे काळे धूर स्पष्टपणे दिसत आहेत. इराणचे प्रमुख वृत्तपत्र 'तेहरान टाइम्स'ने देखील या हल्ल्याची पुष्टी केली. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओंमध्ये शहरात झालेले भीषण स्फोट आणि नागरिकांमध्ये पसरलेली घबराट दिसून येत आहे. प्रत्युत्तर म्हणून इराणकडूनही हल्ले होण्याची शक्यता असल्याने आता इस्रायलमध्येही धोक्याचे सायरन वाजू लागले असून तिथल्या संवेदनशील भागांतून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

Israeli Air Force Strike
Israel Attack: गाझावर इस्रायलचा क्रूर हल्ला; बॉम्बहल्ल्यात 70 जण ठार, मृतांमध्ये 7 निष्पाप चिमुकल्यांचाही समावेश Watch Video

विशेष म्हणजे, हा हल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सातत्यपूर्ण धमक्यांच्या पार्श्वभूमीवर झाला. ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांपासून इराणवर (Iran) कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. अमेरिकन सैन्याने आधीच इराणला चहुबाजूंनी घेरले असून या हल्ल्याला अमेरिकेचे पूर्ण समर्थन असल्याचे मानले जात आहे. इराणच्या अण्वस्त्र केंद्रांना किंवा लष्करी तळांना या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नसली तरी, नुकसानीची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Israeli Air Force Strike
Israel Syria Attack: दमास्कसमधील 'ड्रोन हल्ला' लाइव्ह! स्फोट होताच टीव्ही अँकरची उडाली भंबेरी, व्हिडिओ व्हायरल

या युद्धामुळे जागतिक राजकारणात मोठे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. इराणने जर या हल्ल्याचा बदला घेण्याचा प्रयत्न केला, तर हे युद्ध केवळ दोन देशांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण आखाती देशांना आपल्या कचाट्यात घेऊ शकते. कच्चे तेल आणि जागतिक व्यापारावरही याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. सध्या दोन्ही देशांनी आपल्या लष्कराला हाय अलर्टवर ठेवले असून आगामी काही तास संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून शांततेचे आवाहन केले जात असले तरी, जमिनीवरची परिस्थिती मात्र तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने सरकते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com