अडवईतील फुलासारियो डोंगरावर आग, काजू बागायती खाक; 10 उत्पादकांना बसला आर्थिक फटका

Valpoi Bhironda Forest Fire: भिरोंडा ग्रामपंचायत क्षेत्रातील अडवई येथील फुलासारियो डोंगरावर गुरुवारी दुपारी लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात काजू बागायती तसेच नैसर्गिक संपत्तीचे नुकसान झाले.
Valpoi Bhironda Forest Fire
Valpoi Bhironda Forest FireDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: भिरोंडा ग्रामपंचायत क्षेत्रातील अडवई येथील फुलासारियो डोंगरावर गुरुवारी दुपारी लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात काजू बागायती तसेच नैसर्गिक संपत्तीचे नुकसान झाले. या घटनेमुळे सुमारे दहा काजू उत्पादकांच्या बागायती जळाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

या डोंगर परिसरात अनेकांच्या काजू बागायती असून काही ठिकाणी नव्याने लागवड केलेली, तर काही बागायती जुन्या आहेत. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या बागायतींवर अवलंबून आहे. मात्र अचानक लागलेल्या आगीमुळे अनेकांवर संकट ओढावले आहे.

Valpoi Bhironda Forest Fire
Goa Politics: आतिषी, चर्चिल भेटीमुळे सासष्‍टीत खळबळ, राजकीय घडामोडींना वेग; दोन्‍ही बाजूने सदिच्‍छा भेट असल्याचा दावा

स्थानिकांच्या माहितीनुसार या आगीत दहा पेक्षा अधिक काजू उत्पादकांच्या बागायती जळून खाक झाल्या असून त्यांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Valpoi Bhironda Forest Fire
Goa Budget 2026-27: गोव्याचा अर्थसंकल्प राहणार 'पीपल सेंट्रिक', मुख्यमंत्र्यांनी साधला उद्योजकांशी संवाद; रोजगारावर देणार विशेष भर!

तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात

आग लागल्याचे समजताच काजू उत्पादक व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जोरदार वाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरत गेल्याने नागरिकांना ती नियंत्रणात आणणे शक्य झाले नाही.

अखेर वाळपई अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करत सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com