गोव्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या काँग्रेस आमदारांच्या पक्षांतर हलाचालींना बुधवारी भाजपमध्ये सामिल होऊन मुर्त स्वरूप आले. काँग्रेसचे दिग्गज आणि बडे नेते म्हणून ओळख असलेले माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधीपक्षनेते मायकल लोबो यांच्यासह मोठे काँग्रेस नेते आता भाजपवासी झाले आहेत. काँग्रेसमधील या मोठ्या बंडाची देशभर चर्चा आहे. काँग्रेसचे गोवा प्रदेश प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी मात्र भाजप आणि बंडखोर काँग्रेस आमदारांवर तिखट शब्दात टिका करत आगपाखड केली आहे. ( Congress MLA Digambar Kamat, Michael Lobo along with eight other's join BJP Today)
"गोव्यातील बंडखोर काँग्रेस आमदारांवर टिका करताना दिनेश गुंडूराव म्हणाले, गोव्यातील जनतेने या आमदारांना काँग्रेसचे उमेदवार म्हणून मतदान केले. या आमदारांनी मंदीर, चर्च, दर्गा याठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही अशी शपथ घेतली. नेहमीच काँग्रेस सोबत राहू अशी संविधानाची शपथ देखील या आमदारांनी घेतली होती. पण, दिगंबर कामत, मायकल लोबो यांनी धोका अन् निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे." अशी तिखट शब्दात टिका दिनेश गुंडूराव यांनी केली आहे.
"गोव्यात लोकशाही मुल्ये संपविण्याचे काम जोरात सुरू आहे. आमदारांनी मोठ्या प्रमाणावर पैसे दिले जाताहेत, भाजप विरोधक संपविण्यासाठी प्रयत्नशील आहे. भाजपकडून सत्ता आणि पैशाचा दुरूपयोग केला जात आहे." असा आरोप दिनेश गुंडूराव यांनी केला आहे.
दरम्यान, काँग्रेस आमदारांच्या या बंडानंतर गोव्यातील राजकीय समीकरण देखील बदलले आहे. भाजप सत्तेत मजबूत बसला असताना काँग्रेस आमदार त्यांना जाऊन मिळाल्याने भाजपला हत्तीचे बळ मिळाले आहे. तसेच, राज्यातील विरोधी पक्षाची भुमिका कोण सांभाळणार हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.