'किंग कोब्रां'चा होतो रेल्वेतून गोव्यात प्रवास! संशोधनातून धक्कादायक माहिती

King Cobra in Goa Train Research: गोव्यातील रेल्वे रुळाजवळ आणि रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर आढळलेले हे ‘नागराज’ पाहता ते कदाचित रेल्वेतून प्रवास करत असावेत, असे एका संशोधनातून समोर आले आहे.
King Cobra in Goa Train Research
King Cobra in Goa Train ResearchDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भारतातील किंग कोब्रा म्हणजेच ‘नागराज’ म्हणून ज्याची ओळख आहे. गोव्यातील रेल्वे रुळाजवळ आणि रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर आढळलेले हे ‘नागराज’ पाहता ते कदाचित रेल्वेतून प्रवास करत असावेत, असे एका संशोधनातून समोर आले आहे. सुरत येथील सर्पतज्ज्ञ दिकांश परमार यांच्या अमेरिकेच्या प्रसिद्ध जर्नल ‘बायोट्रॉपिका’मध्ये प्रकाशित झालेल्या प्रबंधातून हे स्पष्ट झाले आहे.

घनदाट जंगलात राहणारा किंग कोब्रा रेल्वेच्या रुळांपर्यंत किंवा रेल्वेपर्यंत पोहोचतो कसा? गोव्याकडे जाणारे अनेक रेल्वे मार्ग घनदाट जंगलातून जातात. त्यामुळेच थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांतून किंग कोब्रा शिकार किंवा आश्रयाच्या शोधात रेल्वेच्या रुळाजवळ किंवा रेल्वेमध्ये जात असावेत, असा निष्कर्ष काढला गेला आहे.

या प्रबंधाची दखल ‘बीबीसी’नेही घेतली आहे. शास्रज्ञ तथा सर्पतज्ज्ञ दिकांश परमार यांच्यासोबत या संशोधनात कॅलिफोर्नियाच्या व्हिक्टरव्हॅली कॉलेजचे जीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. हेन्रिक केसर आणि असोसिएट प्राध्यापक डॉ. डेनिस रोडर (लिबनीज इन्स्टिट्यूट फॉर द ॲनालिसिस ऑफ बायोडायव्हर्सिटी चेंज, बोन, जर्मनी) यांचाही सहभाग राहिला आहे. परमार यांनी केलेले हे अनोखे संशोधन आहे.

King Cobra in Goa Train Research
Goa Politics: आतिषी, चर्चिल भेटीमुळे सासष्‍टीत खळबळ, राजकीय घडामोडींना वेग; दोन्‍ही बाजूने सदिच्‍छा भेट असल्याचा दावा

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, शास्रज्ञांनी केलेल्या गोव्यातील ४७ ठिकाणांच्या अभ्यासात पाच रेल्वे स्टेशनजवळ ‘नागराज’ आढळला असून ही ठिकाणे त्याच्या नैसर्गिक अधिवासापासून खूप लांब आहेत. या अभ्यासासाठी या शास्रज्ञांनी गोव्यातील अमृत सिंग यांच्या ‘ॲनिमल रेस्क्यू स्क्वॉड’चीही मदत घेतली आहे. हा अभ्यास सूचित करतो की, किंग कोब्राच्या राहण्याच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे या सापांच्या संरक्षणाला, संवर्धनाला आणि लोकांच्या सुरक्षिततेलाही मोठा धोका निर्माण होत आहे.

असोसिएट प्राध्यापक डॉ. डेनिस रोडर यांच्या मते, किंग कोब्राचं संरक्षण फार गरजेचे आहे. जर हे साप मालगाडी किंवा प्रवासी रेल्वेमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतील, तर ते मानवांसाठी धोकादायक आहे आणि सापांसाठीही.

रेल्वे जंगलात अनावश्यकपणे थांबवू नयेत. रेल्वेच्या डब्यांत अन्न ठेवू नये, कारण त्यामुळे उंदीर येतात. तसेच जंगलांचा नाश थांबवला पाहिजे, जेणेकरून सापांसारखे वन्य प्राणी रेल्वेच्या रुळांपर्यंत येण्यास भाग पडणार नाहीत. हे संशोधन केवळ एक रंजक पर्यावरणीय कथा नाही, तर वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी आणि लोकांच्या सुरक्षिततेसाठी दिलेला इशाराही आहे.

King Cobra in Goa Train Research
Goa Budget 2026-27: गोव्याचा अर्थसंकल्प राहणार 'पीपल सेंट्रिक', मुख्यमंत्र्यांनी साधला उद्योजकांशी संवाद; रोजगारावर देणार विशेष भर!

गोव्यातील ४७ ठिकाणांचा अभ्यास

गोव्यातील ॲनिमल रेस्क्यू स्क्वॉडने कोब्रा वाचवलेल्या ४७ ठिकाणांचा अभ्यास केला. यात १८ ठिकाणे उत्तर गोव्यात आणि २९ ठिकाणे दक्षिण गोव्यातील आहेत. या अभ्यासात ही सर्व ठिकाणे एकतर रेल्वे स्टेशनजवळ किंवा रेल्वे मार्गाजवळची आहेत. गोवा ॲनिमल रेस्क्यू स्क्वॉडने २००२ ते २०२४ दरम्यान एकूण १२० किंग कोब्रा वाचवले.

या सर्व ठिकाणांचा या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे. दक्षिण गोव्यात चांदोर रेल्वे स्टेशन येथे किंग कोब्राची केलेल्या सुटकेचा, तसेच वास्को द गामा रेल्वेस्थानकापासून दोनशे मीटर अंतरावर, लोलये, पाळोळे आणि पेडणे रेल्वे स्टेशनजवळ कोब्रा सापडल्याचा या प्रबंधात उल्लेख करण्यात आला आहे. संशोधकांच्या मते जेव्हा रेल्वे कर्नाटकातून गोव्यात येते, ती मुख्यतः कर्नाटकच्या कॅसलरॉक भागातून येते. तिथे घनदाट जंगल आहे. या भागात किंग कोब्रा मोठ्या प्रमाणात आढळतात, संशोधनाच्या आधारे, या टीमने ‘रेल्वे डिस्पर्सल हायपोथिसिस’ ही नवीन कल्पना मांडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com