पाकड्यांचा गेम होणार? पल्लेकेलेत पावसाचे काळे ढग; 'वरुणराजा' पाकिस्तानला घरचा रस्ता दाखवणार? जाणून घ्या Weather Report

PAK VS SL: टी-२० विश्वचषक २०२६ मधील सर्वात उत्कंठावर्धक वळण आता पाहायला मिळत आहे.
PAK VS SL
PAK VS SLDainik Gomantak
Published on
Updated on

टी-२० विश्वचषक २०२६ मधील सर्वात उत्कंठावर्धक वळण आता पाहायला मिळत आहे. आज २८ फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात पल्लेकेलेच्या मैदानावर सामना रंगणार आहे. श्रीलंकेचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले, तरी पाकिस्तानसाठी हा सामना म्हणजे 'करो या मरो'ची स्थिती आहे. मात्र, या निर्णायक लढतीपूर्वी पाकिस्तानच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे, कारण पावसाने या सामन्यात व्यत्यय आणल्यास पाकिस्तानचे स्पर्धेतील गाठोडे मायदेशी जाण्यासाठी बांधले जाऊ शकते.

पाऊस, ओव्हर कपातीची टांगती तलवार

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पल्लेकेलेमध्ये पावसाची शक्यता १० टक्क्यांपर्यंत असली, तरी आकाशात ढगांची गर्दी राहण्याची शक्यता आहे. तापमान २७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. पाकिस्तानला केवळ विजय मिळवून चालणार नाही, तर त्यांना धावगती (Net Run Rate) सुधारण्यासाठी मोठा विजय हवा आहे. जर पावसामुळे सामन्यात खंड पडला किंवा षटकांची कपात झाली, तर पाकिस्तानला आपली धावगती सुधारण्याची संधी मिळणार नाही. अशा स्थितीत सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल, जो पाकिस्तानला बाद करण्यासाठी पुरेसा ठरेल.

PAK VS SL
Goa Politics: आतिषी, चर्चिल भेटीमुळे सासष्‍टीत खळबळ, राजकीय घडामोडींना वेग; दोन्‍ही बाजूने सदिच्‍छा भेट असल्याचा दावा

उपांत्य फेरीसाठी 'हे' आहे कठीण समीकरण

पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी केवळ नशिबाचीच नाही, तर फलंदाजी आणि गोलंदाजीतील धडाक्याची गरज आहे. जर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली, तर त्यांना श्रीलंकेवर किमान ६४ धावांनी विजय मिळवावा लागेल. दुसरीकडे, जर ते लक्ष्याचा पाठलाग करत असतील, तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत १३.१ षटकांत सामना खिशात घालावा लागेल. पावसाच्या व्यत्ययामुळे मैदानावर ओलावा राहिल्यास फिरकीपटूंना चेंडू वळवणे कठीण जाईल, ज्याचा फटका पाकिस्तानला बसू शकतो.

PAK VS SL
Goa Pollution: गोव्यातील प्रदूषण चाचणी यंत्रणा कोलमडली, पर्यावरण तज्ज्ञांकडून नाराजी; व्यवस्थापनाचा अभाव, प्रमुख शहरांत चाचणी यंत्रणाच नाही

भारत-पाक फायनलची शक्यता कायम

क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम लढत पाहायला मिळू शकते. जर पाकिस्तान आजचा अडथळा पार करून उपांत्य फेरीत पोहोचला आणि दुसऱ्या बाजूला भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली, तर विश्वचषकाच्या इतिहासात पुन्हा एकदा या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील महायुद्ध पाहायला मिळेल. साखळी फेरीत यापूर्वीच हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते, मात्र अंतिम सामन्यातली लढत ही अधिक थरारक असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com