Goa: "ऑपरेशन किचड" गोव्यातील बंडानंतर काँग्रेस नेत्यांची भाजपवर सडकून टिका

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला भाजप घाबरली
Goa: "ऑपरेशन किचड" गोव्यातील बंडानंतर काँग्रेस नेत्यांची भाजपवर सडकून टिका

गोव्यात भाजपचे 'ऑपरेशन लोटस' यशस्वी झाले असून, जेष्ठ काँग्रेस नेते दिगंबर कामत, मायकल लोबो यांच्यासह आठ आमदार भाजपमध्ये सामिल झाले आहेत. काँग्रेसची देशात भारत जोडो यात्रा सुरू असताना गोव्यात मात्र काँग्रेसला मोठा झटका बसल्याने, राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. काँग्रेसने मात्र भाजप टिका करत गोव्यातील बंडाला "ऑपरेशन किचड" म्हटले आहे. पैसा, मंत्रीपदे आणि इतर प्रलोभने दाखवून विरोधी पक्ष संपविण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

काँग्रेसचे जेष्ठ नेते पवन खेरा यांनी भाजपवर निशाना साधत, "काँग्रेसच्या भारत जोडो अभियानाला भाजप भयभित झाले आहे. 'ऑपरेशन किचड'च्या रूपानं त्याचा परिणाम गोव्यात दिसून आला. मागील काही दिवसांपासून भाजपचे हा प्रयत्न सुरू होते. त्यासाठी पैशांचे लालच, एजन्सीकडून, गुंडाकडून धमकी दिल्या जातात. पक्ष अवघड मार्गाने वाटचाल करत आहे. या रस्त्यावर तोच वाटचाल करू शकतो जा या मार्गावर कितीही संकटे आली तरी हा मार्ग सोडणार नाही."

Goa: "ऑपरेशन किचड" गोव्यातील बंडानंतर काँग्रेस नेत्यांची भाजपवर सडकून टिका
आमदारांनी शपथ घेऊनही शेवटी गोव्यात काँग्रेस फुटलीच, 'या' चुकांची होतेय चर्चा

माजी केंद्रिय मंत्री, काँग्रेसचे जेष्ठ नेते जयराम रमेश यांनी देखील भाजपवर टिका केली आहे. "भारत जोडो यात्रेचे यश पाहून, भाजपने गोव्यात ऑपरेशन किचड फास्टट्रॅक केले आहे. दररोज चुकीची माहिती प्रसारित करून दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले जाताहेत. आम्ही भाजपचे हे घाणेरडे राजकारण दूर करू." असे जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Goa: "ऑपरेशन किचड" गोव्यातील बंडानंतर काँग्रेस नेत्यांची भाजपवर सडकून टिका
'धोका अन् निर्लज्जपणाचा कळस'; दिनेश गुंडूराव यांची बंडखोर आमदारांवर आगपाखड

"तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्राईन म्हणाले, आम्हाला माहिती होते हे एक दिवस होणारच होते. आम्हाला माहित होते हे बदमाश तुम्हाला निराश करतील. तृणमूल काँग्रेसवर विश्वास ठेवा, आम्ही प्रत्येकवेळी तुमच्यासाठी उपलब्ध असेन." असे ट्विट डेरेक ओ ब्राईन यांनी केले आहे.

Goa: "ऑपरेशन किचड" गोव्यातील बंडानंतर काँग्रेस नेत्यांची भाजपवर सडकून टिका
Alex Reginald : ही तर काँग्रेस नेत्यांच्या श्रीमुखात बसलेली सणसणीत चपराक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com