Esakal No 1 Marathi News Website Dainik Gomantak
महाराष्ट्र

Esakal No 1: 19.5 दशलक्ष युजर्सचं प्रेम! डिजिटल जगात 'सकाळ'च्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा मोहोर

Esakal No 1 Marathi News Website: डिजिटल मीडिया क्षेत्रातील सर्वात विश्वासार्ह मानली जाणारी विश्लेषक संस्था 'कॉमस्कोअर' (Comscore) ने नुकताच नोव्हेंबर 2025 चा रिपोर्ट प्रसिद्ध केला.

Manish Jadhav

पुणे: मराठी पत्रकारितेचा प्रदीर्घ वारसा आणि काळानुरुप बदलत जाणारी तंत्रज्ञानाची दृष्टी यांचा मेळ घालत 'ई-सकाळ'ने (esakal.com) डिजिटल माध्यमांच्या महासागरात एक नवा मैलाचा दगड प्रस्थापित केला. डिजिटल मीडिया क्षेत्रातील सर्वात विश्वासार्ह मानली जाणारी विश्लेषक संस्था 'कॉमस्कोअर' (Comscore) ने नुकताच नोव्हेंबर 2025 चा रिपोर्ट प्रसिद्ध केला. या रिपोर्टनुसार, 'ई-सकाळ' हे भारतातील सर्वाधिक वाचले जाणारे आणि पसंती दिली जाणारे 'नंबर 1' मराठी न्यूज पोर्टल ठरले.

वाचकांच्या विश्वासाची मोहोर

'कॉमस्कोअर'च्या ताज्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2025 या एकाच महिन्यात तब्बल 19.5 दशलक्ष (19.5 मिलियन) युनिक युजर्संनी 'ई-सकाळ'ला भेट दिली. ही आकडेवारी प्रतिस्पर्धी मराठी न्यूज वेबसाईटच्या तुलनेत खूपच जास्त असून ई-सकाळने डिजिटल क्षेत्रातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. केवळ आकडेवारी वाढवणे हा उद्देश न ठेवता, सखोल विश्लेषण, विश्वसनीय बातम्या आणि वाचकांशी जोडलेली नाळ यामुळेच हे यश शक्य झाले.

प्रगतीचा वेग थक्क करणारा

'ई-सकाळ'च्या प्रगतीचा आलेख पाहिला तर लक्षात येते की, ही प्रगती अत्यंत सातत्यपूर्ण राहिली आहे. मे 2025 मध्ये ई-सकाळने 16.5 दशलक्ष युजर्सचा टप्पा गाठला होता. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल 3 दशलक्ष नवीन वाचकांची भर पडली असून नोव्हेंबर अखेर हा आकडा 19.5 दशलक्षवर पोहोचला आहे. डिजिटल विश्वात इतक्या मोठ्या प्रमाणावर वाचकांचे प्रेम मिळवणे, ही बाब ई-सकाळच्या दर्जेदार पत्रकारितेची पावतीच मानली जाते.

दर्जेदार पत्रकारिता आणि वेगवान बातम्या

आजच्या माहितीच्या युगात 'फेक न्यूज' आणि अफवांचे पीक मोठ्या प्रमाणावर असताना वाचकांना खात्रीशीर माहिती हवी असते. 'ई-सकाळ'ने नेहमीच विश्वासार्हतेला प्राधान्य दिले. राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, अर्थकारण आणि तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रांतील बातम्यांचे वेगवान आणि अचूक कव्हरेज हे ई-सकाळचे वैशिष्ट्य आहे. याशिवाय, ग्रामीण भागातील प्रश्नांपासून ते जागतिक घडामोडींपर्यंतचा आवाका 'ई-सकाळ'ने आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रभावीपणे मांडला.

वैचारिक दिशा

हे अभूतपूर्व यश केवळ 'सकाळ' समूहाचे नसून ते जगभरातील कानाकोपऱ्यात पसरलेल्या मराठी वाचकांचे आहे. वाढत्या स्मार्टफोन वापराच्या काळात आणि इंटरनेट क्रांतीमुळे माहिती मिळवण्याची पद्धत बदलली आहे. या बदलत्या काळानुसार स्वतःला अपडेट ठेवत 'ई-सकाळ'ने केवळ बातमीच दिली नाही, तर वाचकांना वैचारिक दिशा देण्याचे कामही केले. आगामी काळात नवनवीन फिचर्स आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने वाचकांना अधिक समृद्ध अनुभव देण्याचा 'ई-सकाळ'चा मानस आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT