Surya Gochar 2026: वर्ष संपण्यापूर्वी 'या' 5 राशींची चांदी! सूर्य गोचरने बदलणार दिवस; होणार मोठा धनलाभ

Surya Nakshatra Parivartan December 2026: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, या काळात ग्रहांचा राजा सूर्य तब्बल तीन वेळा आपले नक्षत्र बदलणार आहे.
Surya Gochar 2026
Surya Gochar 2026
Published on: 
Updated on: 

Surya Nakshatra Parivartan December 2026: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, या काळात ग्रहांचा राजा सूर्य तब्बल तीन वेळा आपले नक्षत्र बदलणार आहे. पंचांगानुसार, सूर्य 3 डिसेंबर रोजी ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल, त्यानंतर 16 डिसेंबरला मूळ नक्षत्रात आणि वर्षाच्या अखेरीस 29 डिसेंबर रोजी पूर्वाषाढा नक्षत्रात मार्गक्रमण करेल.

एकाच महिन्यात होणारे सूर्याचे हे तिहेरी नक्षत्र परिवर्तन सर्वच राशींवर परिणाम करणारे असले तरी वृषभ, सिंह, कन्या, वृश्चिक आणि मकर या पाच राशींच्या व्यक्तींसाठी हे गोचर विशेष फलदायी आणि भाग्योदयाचे ठरु शकते.

Surya Gochar 2026
Horoscope: मंगळवारी कार्तिक पौर्णिमेचा शुभ योग! चंद्राच्या राशीबदलामुळे 4 राशींना धनलाभाचे संकेत, मिथुन राशीची रखडलेली कामे मार्गी लागणार!

वृषभ राशीच्या जातकांसाठी डिसेंबर महिना आर्थिकदृष्ट्या अत्यंत समाधानकारक राहण्याची चिन्हे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता असून, नोकरी आणि करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील; तसेच नवीन काम सुरु करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरेल. सूर्याचे स्वामित्व असलेल्या सिंह राशीच्या लोकांच्या जीवनावर या बदलाचा थेट सकारात्मक प्रभाव दिसून येईल. या महिन्यात करिअरमध्ये (Career) मोठी झेप घेण्याची संधी मिळेल, नोकरीपेशा व्यक्तींना पदोन्नतीचे योग जुळून येतील आणि समाजात मान-सन्मान व प्रतिष्ठा वाढेल.

Surya Gochar 2026
Daily Horoscope: रवी योग आणि भरणी नक्षत्राची साथ ठरणार लाभदायक! 'या' राशींसाठी सोमवार अत्यंत खास; कामाच्या वेगासोबत विचारांचा समतोल साधा

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे नक्षत्र गोचर प्रगतीचे नवे दालन उघडणारे ठरेल. रखडलेली कामे मार्गी लागून प्रत्येक कार्यात यश मिळेल आणि इतरांना उधार दिलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक बाजू भक्कम होईल. वृश्चिक राशीच्या नोकरदार वर्गासाठी हा काळ अतिशय उत्तम असून भाग्याची भक्कम साथ लाभेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि उत्पन्नात वाढ होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. दुसरीकडे, मकर राशीच्या जातकांच्या सुख-सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होईल. या काळात आर्थिक लाभ होण्यासोबतच अचानक धनलाभाचे अनपेक्षित योग जुळून येण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.