eSakal Comscore: मराठी मीडियात 'ई-सकाळ'चा डंका! 19.5 मिलियन युजर्ससह ठरली देशातील नंबर वन वेबसाइट

Comscore No.1 Marathi News Site November 2025: विश्वासार्हता, वेग आणि दर्जेदार पत्रकारिता यांचा वारसा जपत 'ई-सकाळ'ने (eSakal.com) डिजिटल जगात एक नवा इतिहास रचला आहे.
eSakal Comscore
eSakal ComscoreDainik Gomantak
Published on
Updated on

पुणे: विश्वासार्हता, वेग आणि दर्जेदार पत्रकारिता यांचा वारसा जपत 'ई-सकाळ'ने डिजिटल जगात एक नवा इतिहास रचला आहे. जगभरातील प्रतिष्ठित डिजिटल मीडिया विश्लेषक संस्था 'कॉमस्कोअर' (Comscore) ने जाहीर केलेल्या नोव्हेंबर २०२५ च्या अहवालानुसार, ई-सकाळ ही भारतातील सर्वात जास्त वाचली जाणारी मराठी न्यूज वेबसाईट ठरली आहे. एका महिन्यात तब्बल १९.५ युजर्ससह ई-सकाळने प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत अव्वल स्थान काबीज केलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं प्रगतीपथावर असणाऱ्या ई-सकाळने मे २०२५ मध्ये १६.५ मिलियन युजर्सचा आकडा गाठला होता, जो आता नोव्हेंबरमध्ये १९.५ मिलियनवर पोहोचला आहे. हे यश केवळ आकडेवारीपुरते मर्यादित नसून, ते वाचकांच्या सातत्यपूर्ण विश्वासाचं प्रतीक आहे.

eSakal Comscore
Goa Third District: कहीं ख़ुशी कहीं गम! कुशावतीबाबत धारबांदोड्यात संमिश्र प्रतिक्रिया; राजकीय हेतू, कागदपत्रांच्या अडचणींवरून विरोध

ई-सकाळच्या या घवघवीत यशामागे त्याचे विविधांगी कंटेंट धोरण आहे. राजकीय घडामोडी असोत किंवा स्थानिक समस्या, 'ब्रेकिंग न्यूज' देण्यासोबतच त्या बातमीचे सखोल विश्लेषण करण्यावर ई-सकाळचा भर असतो. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांसह क्रीडा, मनोरंजन, तंत्रज्ञान, लाईफस्टाईल, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या विविध विभागांमुळे प्रत्येक वयोगटातील वाचकांची ई-सकाळ ही पहिली पसंती ठरली आहे.

eSakal Comscore
Goa Farmers Policy: ‘शेतकरी’ची व्याख्या बदलणार! विपणन मंडळाचा कारभार कृषी खात्‍याकडे; हिवाळी अधिवेशनात विधेयक होणार सादर

सकाळ माध्यम समूहाने अनेक वर्षांच्या पत्रकारितेचा अनुभव आणि आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून 'ई-सकाळ'ला नवे रूप दिले आहे. व्हिडिओ रिपोर्ट्स, पॉडकास्ट्स, रिअल-टाइम डॅशबोर्ड्स आणि युजर-फ्रेंडली डिझाइनमुळे वाचकांना बातम्या वाचण्याचा आणि पाहण्याचा एक उत्तम अनुभव मिळतो. ग्रामीण भागापासून ते महानगरांपर्यंत आणि जगभरातील मराठी भाषिक वाचकांना जोडण्याचे काम या प्लॅटफॉर्मने यशस्वीपणे केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com