
Pune Maharashtra: 'ई-सकाळ'ने डिजिटल पत्रकारितेत मोठी प्रगती केली आहे. काॅमस्कोरच्या आकडेवारीनुसार देशातील नंबर एकची मराठी वेबसाईट ठरल्याने हे सिद्ध होते की, मराठी वाचकांचा या पोर्टलला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. डिजिटल माध्यमांमध्ये सातत्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या, तसेच वाचकाभिमुख दृष्टिकोन यामुळे 'ई-सकाळ'ची लोकप्रियता वाढत आहे.
सतत बदलणाऱ्या डिजिटल युगात 'ई-सकाळ'ने केवळ बातम्या पुरवण्यापुरते मर्यादित न राहता, व्हिडिओ कंटेंट, लाईव्ह अपडेट्स, सोशल मीडिया इंटिग्रेशन आणि इतर नव्या सुविधा उपलब्ध करुन देऊन वाचकांना अधिक परिपूर्ण अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. विविध श्रेणीतील विषयांवर सखोल विश्लेषण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि स्थानिक बातम्या यामुळेही 'ई-सकाळ' वाचकांचे खास आकर्षण ठरत आहे.
वाचकांच्या बदलत्या गरजांनुसार 'ई-सकाळ'ने आपल्या कंटेंटमध्ये सातत्याने नावीन्य ठेवले आहे. सोप्या आणि आकर्षक यूजर इंटरफेसमुळे मोबाइल आणि डेस्कटॉप वाचकांसाठीही हे पोर्टल सहजगत्या वापरण्यास अनुकूल आहे. यासह, 'ई-सकाळ'च्या भरवशाच्या आणि चौफेर कव्हरेजमुळेच 'ई-सकाळ' डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात अव्वलस्थानी पोहोचले आहे.
आजच्या डिजिटल युगात वाचक केवळ राजकीय किंवा सामाजिक घडामोडीच नव्हे, तर विविध क्षेत्रांतील बातम्याही जाणून घेण्यास उत्सुक असतात. ‘ई-सकाळ’ने हा बदल हेरुन वाचकांसाठी विविध श्रेणीमध्ये अद्ययावत आणि उपयुक्त माहिती उपलब्ध करुन दिली आहे.
राजकीय घडामोडी: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ताज्या घडामोडींवर सखोल आणि निष्पक्ष विश्लेषण
अर्थकारण आणि शेअर बाजार: अर्थजगत, गुंतवणूक संधी आणि बाजारातील बदल यावर अद्ययावत माहिती
क्रीडा: क्रिकेटसह विविध क्रीडाप्रकारांतील ताज्या घडामोडी आणि खेळाडूंच्या मुलाखती
मनोरंजन: चित्रपट, संगीत, नाटक आणि कलाकारांच्या विशेष बातम्या
प्रवास आणि जीवनशैली: पर्यटन स्थळे, आरोग्यविषयक टिप्स आणि ट्रेंडिंग लाइफस्टाइल विषय
यासोबतच, स्थानिक बातम्यांवर भर देत ‘ई-सकाळ’ने महाराष्ट्रातील विविध शहरांमधील वाचकांपर्यंतही आपली पकड मजबूत केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.