Satish Timbale Trophy: बंद पडलेल्या शालेय क्रिकेटला पणजी जिमखान्याची संजीवनी; 16 वर्षांखालील 8 संघ भिडणार

Under 16 Cricket: पणजी जिमखान्याने त्यांच्या बंद पडलेल्या शालेय क्रिकेट स्पर्धेला संजीवनी दिली आहे.
 Under 16 Cricket
Satish Timbale TrophyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: पणजी जिमखान्याने त्यांच्या बंद पडलेल्या शालेय क्रिकेट स्पर्धेला संजीवनी दिली आहे. यंदापासून राज्यातील आठ निमंत्रित संघांची ‘सतीश तिंबले करंडक’ १६ वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा १ ते १६ डिसेंबर या कालावधीत कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर खेळली जाईल.

स्पर्धेच्या करंडकाचे आणि जर्सीचे सहभागी संघांच्या उपस्थितीत अनावरण झाले. यावेळी स्पर्धेचे वेळापत्रकही निश्चित करण्यात आले. उत्तर विभागात प्रोग्रेस हायस्कूल-साखळी, सारस्वत विद्यालय-म्हापसा, मांद्रे हायस्कूल, मुष्टिफंड हायस्कूल-कुजिरा या शालेय संघांचा, तर दक्षिण विभागात जीव्हीएम ए. जे. द आल्मेदा हायस्कूल-फोंडा, विद्या मंदिर हायस्कूल-चिखली, द न्यू एज्युकेशनल इन्स्टिट्यूट-कुडचडे, भाटीकर मॉडेल हायस्कूल-मडगाव या शालेय संघांचा समावेश आहे.

 Under 16 Cricket
Goa Short Films IFFI: 24 तासांत बनवला लघुपट, 19 वर्षांच्या दिग्दर्शकाचीही कमाल; इफ्फीत गोव्याच्या तरुणाईचा ठसा

समारंभाला पणजी जिमखान्याचे अध्यक्ष मनोज काकुले, क्रिकेट प्रमुख सुरेश महादेवन, व्यवस्थापकीय समिती सदस्य सर्फराज शेख, गिरीश पारेख यांची उपस्थिती होती. नंतर पत्रकार परिषदेत काकुले यांनी सांगितले, की ‘‘पणजी जिमखान्याची जर्मेनिया करंडक शालेय क्रिकेट स्पर्धा मध्यंतरी बंद पडली. ती स्पर्धा मर्यादित स्वरुपात होती. आता आम्ही शालेय क्रिकेट स्पर्धा नव्या व्यापक धर्तीवर खेळविण्याचे ठरविले असून पुरस्कर्ते या नात्याने सतीश तिंबले कुटुंबीयांचे पाठबळ लाभले.

यंदा स्पर्धेचे पहिले आहे. गोवा क्रिकेट असोसिएशनच्या निकषांनुसार संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद पाहून सहभागी संघांची संख्या वाढविण्याचा निर्णय होईल. दरवर्षी ही स्पर्धा घेतली जाईल. विजेत्या-उपविजेत्या संघांना रोख बक्षिसाऐवजी करंडक देण्यात येईल. सहभागी संघांचा प्रवास, आहार, जर्सी आदी सारा खर्च आयोजकांतर्फे केला जाईल.’’

 Under 16 Cricket
Goa Politics: 'मी योग्य तेच केले, निर्णय मतदार घेतील'; मनोज परब यांच्या आरोपांवर बोरकरांचा पलटवार

‘‘राज्यात टी-२० क्रिकेटला जास्त महत्त्व दिले जाते, पण आम्ही शालेय पातळीवरील क्रिकेटपटूंना दीर्घ स्वरुपाच्या क्रिकेटची ओळख व्हावी आणि त्यांचे कौशल्य अधिकप्रमाणात विकसित व्हावे या उद्देशाने स्पर्धेतील सामने प्रत्येकी ४० षटकांचे खेळविण्याचे ठरविले आहे.’’

- मनोज काकुले, पणजी जिमखान्याचे अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.