Palghar Accident Dainik Gomantak
महाराष्ट्र

Palghar Accident: पालघरमध्ये कारचा भीषण अपघात, नवजात बालकासह एकाच घरातील तिघांचा मृत्यू

चार जण जखमी झालेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका ट्रकने मागून कारला धडक दिली. या अपघातात नवजात बालकासह तिघांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झालेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिराजवळ सकाळी 11.45 वाजता हा अपघात झाला.

एका कुटुंबातील सात सदस्य कारमधून मुंबईहून गुजरातला जात असताना एका मंदिराजवळ हा अपघात झाला. यात नरोत्तम राठोड (65), त्यांचा मुलगा केतन राठोड (32) आणि एक वर्षाचा आर.व्ही. राठोड अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये दिपेश राठोड (35), तेजल राठोड (32), मधु राठोड (58) आणि कार चालकासह अडीच वर्षांची मुलगी स्नेहल राठोड यांचा समावेश आहे.

अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताबाबत अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. जखमींची प्रकृती पाहता त्यांचे जबाब नोंदवलेले नाहीत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'त्या 11 जागांवर युतीची चर्चाच नव्हती', अमित पाटकरांचा 'धक्कादायक' खुलासा! काँग्रेस आणि आरजीपीमध्ये विस्फोट?

Rohit Sharma: टी-20 क्रिकेटमध्ये 'हिटमॅन'ची एन्ट्री, लवकरच मैदानात उतरणार? जाणून घ्या कधी आणि कुठे होणार सामने

VIDEO: अमेरिकेचे थंडरबर्ड्स लढाऊ जेट कॅलिफोर्नियात कोसळले; प्रशिक्षणादरम्यान भीषण अपघात, पायलट थोडक्यात बचावला!

AUS vs ENG: मिचेल स्टार्कचा ऐतिहासिक रेकॉर्ड! वसीम अक्रमला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये ठरला जगातील नंबर-1 डावखुरा वेगवान गोलंदाज VIDEO

Goa Live News: आज 11 उमेदवारांकडून अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT