Satara Video: खंबाटकी घाटात ट्रकांची धडक, डिझेल टाकी फुटल्याने दोन्ही ट्रकला भीषण आग

अपघातात अंदाजे दोन ते तीन कोटी रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
Satara Video
Satara VideoDainik Gomantak

खंबाटकी घाटातील दत्त मंदिरासमोर दोन ट्रक एकमेकांना धडकल्यामुळे मोठा अपघात झाला. एका ट्रकची डिझेल टाकी फुटली. त्यामुळे दोन्ही ट्रकला भीषण आग लागली आहे. पुण्याहून सातार्‍याच्या दिशेने जाणार्‍या एका ट्रकचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. दरम्यान, पुण्याहून सातारा-कोल्हापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे.

(Two Trucks Gutted in Fire At Khambatki Ghat, Satara, Loss of three crore reported)

Satara Video
Korgao Rickshaw Fire: भर रस्त्यात बर्निंग टेम्पोचा थरार, टायरही फुटला; पाहा व्हिडिओ

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी 1 च्या सुमारास पुण्याहून सातार्‍याच्या दिशेने निघालेल्या एका ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा ट्रक समोरून जात असलेल्या ट्रकला धडकला. त्यावेळी ट्रकची डिझेल टाकी फुटली. अन आगीचा भडका उडाला. यात दोन्ही ट्रक जळून खाक झाले असून, सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. त्यामुळे पुण्याहून सातार्‍याच्या दिशेने जाणारा वाहतूक थांबविण्यात आली असून, या महामार्गावरील वाहतूक बोगदा मार्गे वळविण्यात आली आहे.

Satara Video
RSS Meet Goa: 'हमारा हिंदू राष्ट्र है'; सरसंघचालक मोहन भागवत यांचे गोव्यात वक्तव्य

या घटनेत सहा एमजी हेक्टर गाड्या व कपडयाचे रोल तसेच दोन मालगाड्या असे मिळुन अंदाजे दोन ते तीन कोटी रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, रस्त्याच्या मध्येच हे ट्रक पेटल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. मार्गावरील वाहतूक बोगद्यामार्गे वळवली असून, वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com