Korgao Rickshaw Fire: भर रस्त्यात बर्निंग टेम्पोचा थरार, टायरही फुटला; पाहा व्हिडिओ

टेम्पोत असलेले दोन मोबाईल फोन व काही कागदपत्रे होती ती देखील जळू खाक झाली आहे
Korgao Rickshaw Fire
Korgao Rickshaw FireDainki Gomantak

धावत्या टेम्पोला भर रस्तात आग लागली. ही आग एवढी भीषण होती की आगीत टेम्पोचा टायरही फुटला व संपूर्ण टेम्पो जळला. टेम्पोत असलेले दोन मोबाईल फोन व काही कागदपत्रे होती ती देखील जळू खाक झाली आहेत. कोरगाव, पेडणे येथे दुपारी 12.30 वाजता ही आगीची घटना घडली. टेम्पोचा चालक सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.

(Running tempo caught fire at Korgao, Pernem)

Korgao Rickshaw Fire
RSS Meet Goa: 'हमारा हिंदू राष्ट्र है'; सरसंघचालक मोहन भागवत यांचे गोव्यात वक्तव्य

मिळालेल्या माहितीनुसार, कोरगाव येथे धावत्या टेम्पोला अचानक आग लागली. टेम्पो रस्त्याकडेला उभा करण्यात आला व पेडणे येथे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. पण तोपर्यंत आगीत टेम्पो प्रचंड नुकसान झाले होते. टेम्पोत असलेले मोबाईल आणि कागदपत्रे देखील जळून खाक झाली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Korgao Rickshaw Fire
Korgao Rickshaw FireDainik Gomantak
Korgao Rickshaw Fire
Varsha Usgaonker: 'गोवेकर असल्याचा मला अभिमान', मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकरकडून मोपाचे कौतुक

दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये टेम्पो पूर्णत: जळाला असून अग्निशन दलाचे जवान आग विझविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान, या आगीमुळे काहीकाळासाठी वाहतूक खोळंबली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com