Israel US Attack on Iran: मध्यपूर्वेत युद्धाचा वणवा पेटला! भारतीय नागरिकांसाठी 'ट्रॅव्हल ॲडव्हायजरी' जारी; सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना

Advisory For Indians in Israel: इस्रायल आणि अमेरिकेने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा संयुक्त लष्करी हल्ला केला.
Advisory For Indians in Israel
Advisory For Indians in IsraelDainik Gomantak
Published on
Updated on

Advisory For Indians in Israel: इस्रायल आणि अमेरिकेने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा संयुक्त लष्करी हल्ला केला. तेहरानसह देशातील सुमारे 30 महत्त्वाच्या ठिकाणांवर एकाच वेळी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडण्यात आला असून या हल्ल्याने संपूर्ण जग हादरले.

विशेष म्हणजे, या मोहिमेत इराणच्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या अण्वस्त्र तळांना लक्ष्य करण्यात आले असून यात इराणचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. या हल्ल्यानंतर इराणमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून परिस्थितीचे गांभीर्य ओळखून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना तातडीने अज्ञात सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

इस्रायलने या लष्करी मोहिमेला 'शील्ड ऑफ जुदाह' (Shield of Judah) असे नाव दिले असून, अमेरिकेच्या थेट सहभागामुळे या युद्धाने जागतिक स्वरुप धारण केले आहे. या हल्ल्यामध्ये इराणचे अनेक वरिष्ठ लष्करी कमांडर मारले गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

इराणमधील (Iran) सत्तापरिवर्तन करणे हाच या हल्ल्यामागचा मुख्य उद्देश असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अत्यंत कडक विधान केले असून, त्यांनी खामेनेई यांना थेट इशारा दिला. "एकतर खामेनेई यांनी शरणागती पत्करावी किंवा मृत्यूला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे," अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली. "आम्हाला हा धोका कायमचा संपवायचा असून हे ऑपरेशन सुरु झाले आहे आणि ते पुढेही सुरुच राहील," असेही ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले.

Advisory For Indians in Israel
Israel Attack On Iran: क्षेपणास्त्रांचा मारा अन् सायरनचा आवाज...! इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला; बॅलिस्टिक मिसाइल्सनी हादरलं 'तेहरान' VIDEO

दुसरीकडे, या भीषण हल्ल्यामुळे इराण संतापला असून त्याने आतापर्यंतचा सर्वात घातक पलटवार करण्याचा इशारा दिला. इराणकडून कोणत्याही क्षणी इस्रायलवर मोठा हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मध्यपूर्वेतील ही बिघडती सुरक्षा व्यवस्था पाहता भारताने अत्यंत सावधगिरीचे पाऊल उचलले आहे.

भारत (India) सरकारने इस्रायलमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी तातडीची 'ट्रॅव्हल ॲडव्हायजरी' जारी केली, यामध्ये भारतीयांना अत्यंत सावध राहण्याचा, सतर्क राहण्याचा आणि इस्रायली अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुरक्षा निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी दूतावासाच्या संपर्कात राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Advisory For Indians in Israel
Iran Attack Israel: तेहरान थरथर कापेल...! युद्धबंदीनंतर इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याने चवताळला इस्त्रायल

या संयुक्त हल्ल्यामुळे जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून कच्च्या तेलाच्या किमती आणि जागतिक बाजारपेठेवर याचे गंभीर परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इस्रायल आणि अमेरिका हे केवळ लष्करी तळांनाच नव्हे, तर इराणच्या राजकीय नेतृत्वालाही लक्ष्य करत असल्याने हे युद्ध दीर्घकाळ चालण्याची चिन्हे आहेत. अण्वस्त्र तळांना लक्ष्य केल्याने पर्यावरणावर आणि सुरक्षेवर होणाऱ्या परिणामांबाबतही आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले असून, इराणचा संभाव्य पलटवार जागतिक शांततेला मोठा सुरुंग लावू शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com