"आई-बाबा मला माफ करा, तुमचे स्वप्न मी पूर्ण करु शकले नाही" पोलीस भरतीतील अपयशाच्या धक्क्यातून 26 वर्षीय तरुणीनं संपवलं जीवन

Police Recruitment Failure Ambernath: एका तरुण मुलीने पोलीस भरतीत सतत येणाऱ्या अपयशामुळे टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली.
Police Recruitment Failure Ambernath
Police Recruitment Failure AmbernathDainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra Crime News: खाकी वर्दी परिधान करुन आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द उराशी बाळगलेल्या एका तरुणीने पोलीस भरतीत सतत येणाऱ्या अपयशामुळे टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली. अंबरनाथ पश्चिम येथील स्वामीनगर भागात राहणाऱ्या 26 वर्षीय प्रतीक्षा राणे हिने नैराश्यातून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकरीसाठी जीवतोड मेहनत करणाऱ्या तरुणांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा राणे गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस दलात भरती होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत होती. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी ती सराव करत होती. पोलीस विभागात नोकरी मिळवून आपल्या आई-वडिलांना चांगले आणि सुखी जीवन देण्याचे तिचे मोठे स्वप्न होते. मात्र, वारंवार प्रयत्न करुनही नशिबाची साथ न लाभल्याने आणि प्रत्येक वेळी यश थोडक्यात हुलकावणी देत असल्याने ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती. या नैराश्यातून बाहेर पडणे तिला कठीण झाले आणि 26 फेब्रुवारीच्या मध्यरात्री तिने राहत्या घरी आत्महत्या केली.

Police Recruitment Failure Ambernath
Crime News: वारंवार पैसे मागते, म्हणून पतीने पत्नीला संपविले! साळगावातील धक्कादायक घटनेने राज्य हादरले

प्रतिक्षाने मृत्यूपूर्वी एक हृदयद्रावक 'सुसाईड नोट' लिहून ठेवली, ज्यामध्ये तिने आपल्या आई-वडिलांची माफी मागितली. "आई-बाबा, मला माफ करा, तुम्हाला जे आयुष्य मला द्यायचे होते आणि जे स्वप्न मी पाहिले होते, ते मी पूर्ण करु शकले नाही," अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या मुलीचा मृतदेह पाहून पालकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सय्यद शब्बीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

Police Recruitment Failure Ambernath
Crime News: राजकारणात खळबळ! 'आप' नेत्याची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या, भररस्त्यात 10 राऊंड फायरिंग Watch Video

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सय्यद शब्बीर यांनी सांगितले की, प्रतीक्षा अनेक वर्षांपासून पोलीस भरतीसाठी प्रयत्नशील होती, मात्र यश मिळत नसल्याने ती डिप्रेशनमध्ये (Depression) गेली होती. या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. एका होतकरु तरुणीने अशा प्रकारे आपले जीवन संपवल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com