Kiran Navgire Catch Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: किरण नवगिरेच्या अफलातून कॅचने संपवली धोकादायक शफालीची खेळी, पाहा Video

DC vs UPW: दिल्ली कॅपिटल्सची आक्रमक सलामीवीर शफालीला किरण नवगिरने शानदार कॅच घेत माघारी धाडले.

Pranali Kodre

Kiran Navgire Catch: वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत पाचवा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध युपी वॉरियर्स संघात पार पडला. डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्लीने 42 धावांनी विजय मिळवला. असे असले तरी युपीच्या किरण नवगिरीने शफाली वर्माचा घेतलेला झेल या सामन्यात चर्चेचा विषय ठरला होता.

या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या दिल्ली संघाकडून पहिल्या सामन्याप्रमाणेच या सामन्यातही मेग लेनिंग आणि शफाली वर्मा यांनी शानदार सुरवात केली. त्यांनी 6 षटकातच अर्धशतकी भागीदारी केली होती. मात्र त्यांची जोडी ताहलिया मॅकग्राने तोडण्याच यश मिळवले. तिने 14 चेंडूत 17 धावा करणाऱ्या शफालीला किरणच्या हातून झेलबाद केले.

किरणने घेतला अप्रतिम झेल

या सामन्यात सातव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर शफालीने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. तिने फाईन लेगला शॉट मारलाही. मात्र, तो फटका अचूक बसला नाही त्यामुळे चेंडू सीमापार करण्यापूर्वीच किरणने तिच्या उजव्या बाजूला डाईव्ह मारत शानदार झेल घेतला. त्यामुळे धोकादायक वाटणाऱ्या शफलीचा अडथळा दूर झाला.

दिल्लीचे पुन्हा द्विशतक

शफाली जरी लवकर बाद झाला तरी दिल्लीकडून कर्णधार लेनिंगने 42 चेंडूत 70 धावांची खेळी केली. तसेच जेमिमाह रोड्रिगेज आणि जेस जोनासन यांनीही आक्रमक खेळी केल्या. जेमिमाहने 22 चेंडूत 34 धावांची नाबाद खेळी केली. त्याचबरोबर जोनासनने 20 चेंडूत 42 धावांनी नाबाद खेळी केली. त्यामुळे दिल्लीने सलग दुसऱ्या सामन्यात 200 पेक्षा अधिक धावा केल्या. दिल्लीने युपी वॉरियर्सविरुद्ध 20 षटकात 4 बाद 211 धावा केल्या.

युपीकडून शबनिम इस्माईल, राजेश्वरी गायकवाड, ताहलिया मॅकग्रा आणि सोफी एलक्लेस्टोन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर 212 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या युपीकडून ताहलिया मॅकग्राने 50 चेंडूत 90 धावांची खेळी केली. मात्र, तिला अन्य खेळाडूंकडून फारशी साथ मिळाली नाही. त्यामुळे युपीला 20 षटकात 5 बाद 169 धावा करता आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Bicholim: ..शुभ्र जलधारा कोसळती! डिचोलीतील धबधब्यावर पर्यटकांची गर्दी; आबालवृद्ध लुटताहेत आनंद

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

SCROLL FOR NEXT